Anushka Sharma, looking at an interview about private life! | ​अन् खासगी आयुष्याबद्दलची मुलाखत पाहून भडकली अनुष्का शर्मा!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या खासगी आयुष्यात कुणाचीही लुडबूड आवडत नाही. खासगी आयुष्याबद्दल म्हणूनच ती क्वचित बोलते. हेच कारण आहे की, क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतचे गुपचूप लग्न आणि यानंतरचे वैवाहिक आयुष्य याबद्दल अनुष्का अद्यापही मीडियाशी बोललेली नाही. पण अलीकडे एका बंगाली वृत्तपत्राने अनुष्काच्या पर्सनल लाईफबद्दलची मुलाखत प्रकाशित केली. अनुष्काच्या या मुलाखतीने त्या बंगाली वृत्तपत्राचा खप किती वाढला, ते आम्हाला ठाऊक नाही. पण एक गोष्ट मात्र आम्हाला चांगलीच ठाऊक आहे. होय, ही मुलाखत पाहून अनुष्का कमालीची संतापलीयं. इतकी की, या मुलाखतीचे कात्रण twitterवर शेअर करत, अनुष्काने या वृत्तपत्राला चांगलेच फैलावर घेतले. कारण अनुष्काने या वृत्तपत्राला अशी कुठलीही मुलाखत दिली नव्हतीचं. ‘मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल संबंधित वृत्तपत्राला वा अन्य कुणालाही मुलाखत दिलेली नाही. यावरून एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे तुमचे वैयक्तिक स्वातंत्र्य  किती बेपर्वाईने घेतले जाते,’ अशा शब्दांत अनुष्काने तिचा संताप बोलून दाखवला आहे.


ALSO READ : विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला अशा अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा!

विराटने काही दिवसांपूर्वी सोशल अकाऊंटवर शेअर केलेल्या आणि पुढे व्हायरल झालेल्या एका फोटोबद्दल अनुष्काची संबंधित मुलाखत आहे. या फोटोला ३४ लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्री अनुष्का  लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या वैवाहिक आयुष्यावर बोलली, असा दावाही या मुलाखतीत करण्यात आला आहे.
गत डिसेंबर महिन्यात अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले होते. लग्नानंतरचा ‘परी’ हा अनुष्काचा पहिला चित्रपट नुकताच रिलीज झाला.‘परी’ हा अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा तिसरा सिनेमा आहे. क्लीन स्लेट फिल्म्स या अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसने आत्तापर्यंत ‘एन एच10’ आणि ‘फिल्लोरी’ अशा दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेला अनुष्काचा ‘एन एच10’ हा चित्रपट ब-यापैकी यशस्वी ठरला होता.  समीक्षकांनी या चित्रपटाचा दाद दिली होती. यानंतर गतवर्षी आलेल्या ‘फिल्लोरी’ या चित्रपटात अनुष्का भूताच्याच पण विनोदी भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता पण यातील अनुष्काच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘परी’तील अनुष्काच्या अभिनयाचेही कौतुक होतेय.
Web Title: Anushka Sharma, looking at an interview about private life!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.