Anushka Sharma becomes successful actress, successful producer and now designer | ​ यशस्वी अभिनेत्री, यशस्वी निर्माती आणि आता डिझाईनर बनली अनुष्का शर्मा!!

अनुष्का शर्मा एक गुणी अभिनेत्री तेवढीच गुणी निर्माती सुद्धा. टॅलेंट आणि स्वत:च्या वेगळ्या पर्सनॅलिटीच्या जोरावर अनुष्काने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज अनुष्का आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अभिनयात मोठे नाव कमावल्यानंतर अनुष्काने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. निर्मिती क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाच अनुष्का आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. होय, अनुष्काने आता क्लोथ डिझाईनिंगच्या जगातही पाऊल ठेवले आहे. अनुष्काने ‘नुश’ नामक स्वत:ची सिग्नेचर लाईन लॉन्च केली आहे. ‘नुश लेवल अंतर्गत’ अनुष्काने डिझाईन केलेल्या कपड्यांना बाजारात आणले जाईल. या लेवल कनेक्शनसाठी अनुष्काने स्टाईलपासून फॅब्रिक व कलरपर्यंतची निवड स्वत: केली आहे. ‘नुश’ मध्ये अनुष्काची पूर्ण झलक चाहत्यांना पाहता येऊ शकेल.गेल्या वर्षभरापासून अनुष्का ‘नुश’ ब्रांड लॉन्च करण्याच्या तयारीत होती. अनुष्काने याबद्दल सांगितले की, ‘नुश’ हा ‘क्लीन स्लेट फिल्म्स’नंतरचा माझा दुसरा प्रयत्न आहे. एक तरूण मुलगी या नात्याने माझ्या फॅशन सेन्सनुसार शॉपिंग करायची झाल्यास सगळे काही एका छताखाली मिळावे, असे मला वाटते. पण प्रत्यक्षात असे होत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी अनेक स्टोर्सचे उंबरठे झिजवावे लागतात. माझा प्रयत्न हाच आहे. सगळे काही एका छताखाली मिळावे. प्रत्येक ड्रेस स्टाईल एकत्र आणणे हा ‘नुश’चा उद्देश आहे. कॉलेजपासून तर हँगआऊट, पार्टी, टॅड्रिशनल इव्हेंट अशा सगळ्यासांठी प्रत्येक स्टाईलचा ड्रेस ‘नुश’मध्ये उपलब्ध असेल. अनुष्काने आपल्या या ब्रांडच्या लॉन्चचा व्हिडिओ इंटरनेटवरही शेअर केला आहे.

ALSO READ : ​विराट कोहलीला अजिबात आवडत नाही, गर्लफ्रेन्ड अनुष्का शर्माची ‘ही’ सवय!

अनुष्काचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. यात ती शाहरूख खानसोबत दिसली होती. या चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर फार प्रतिसाद मिळाला नाही. पण यातील अनुष्काच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली होती. लवकरच अनुष्काच्या प्रॉडक्शनचा ‘परी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अनुष्का स्वत: लीड रोलमध्ये आहे.
Web Title: Anushka Sharma becomes successful actress, successful producer and now designer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.