‘इश्क और मुश्क छिपाए नहीं छिपता,’ अशी हिंदीत एक म्हण आहे. हिंदीतील ही म्हण याघडीला अभिनेत्रीअनुष्का शर्मा व क्रिकेटपटूविराट कोहली या दोन लव्हबर्ड्सला तंतोतंत लागू पडतेय. तूर्तास ही जोडी लग्न करणार, अशी जोरदारचर्चाआहे. अर्थात अनुष्काच्या प्रवक्त्याने ही बाब नाकारली आहे. अनेक लोक विराट व अनुष्काच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगण्यात जुटले आहेत. पण विरूष्काच्या लग्नाची बातमी अफवा नसून ती खरी आहे, याचेही काही संकेत मिळत आहेत.गत रात्री विराट व अनुष्का दोघेही विदेशात रवाना झालेत. काहींच्या मते, दोघेही स्वित्झर्लंडला गेलेत तर काहींच्या मते, दोघेही इटलीला रवाना झालेत. विराट दिल्लीच्या विमानतळावरून रवाना झाला तर अनुष्काने मुंबईतून फ्लाईट घेतली.  लग्नाच्या चर्चेदरम्यान हे लव्हबर्ड्स असे देशाबाहेर जात असतील तर चर्चा तर होणारच. त्यातच अनुष्कासोबत तिचे अख्खे कुटुंब आणि शर्मा कुटुंबाचे नेहमीचे पंडितजी आहेत, म्हटल्यावर चर्चेचे पेव तर फुटणारच.होय, काल रात्री अनुष्का मुंबई विमानतळावरून विदेशात रवाना झाली तेव्हातिचे अख्खे कुटुंब तिच्यासोबत होते. केवळ इतकेच नाही तर शर्मा कुटुंबांचे नेहमीचे पंडितजीही तिच्यासोबत होते.गतवर्षी हे पंडितजी अनुष्काच्या गावी पूजा करताना दिसले होते. एका फोटोत अनुष्का याच पंडितजींसोबत धार्मिक विधी करताना दिसली होती. हेच पंडितजी  अनुष्कासोबत विदेशात रवाना झाल्याने विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेने आणखी जोर धरला आहे.ALSO READ : ​लग्नाच्या चर्चेदरम्यान गुपचूप स्वित्झर्लंडला रवाना झालेत अनुष्का शर्मा अन् विराट कोहली !

सूत्रांचे मानाल तर अनुष्काच्या पापांनी शेजारच्यांना फोन करून या लग्नाचे निमंत्रण दिल्याचीही खबर आहे. अर्थात ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचू नये, अशी विनंतीही शेजा-यांना करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अनुष्का व विराट लग्न करणार, अशीच बातमी आहे. उद्या ९ डिसेंबरपासून या लग्नाचे विधी सुरु होत आहेत, असेही सांगितले जातेय. हे लग्न इटलीत होणार,अशी चर्चा आहे. विराटचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी आधीपासूनच इटलीसाठी तिकिट बुक केले आहे. विराटचे अगदी जवळचे मानले जाणारे कोच राजकुमार शर्मा यांनीही यादरम्यान सुट्टी घेतल्याने विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला बळ मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विराट व अनुष्का दोघेही डिझाईनर सब्यसाची यांना भेटले होते. कदाचित ही भेट वेडिंग आऊटफिट सिलेक्शनसाठी असावी, असाही अंदाज आहे. 
Web Title: Anushka Sharma and Virat Kohli's slogan! Proof of this !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.