Anushka Sharma and Virat Kohli will be the only two cricketer to be present | ​केवळ हे दोनच क्रिकेटर लावणार अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाला उपस्थिती

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली लवकरच लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अर्थात अनुष्काच्या प्रवक्त्याने ही बाब नाकारली आहे. अनेक लोक विराट आणि अनुष्काच्या लग्नाची बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगत आहेत. पण विरूष्काच्या लग्नाची बातमी अफवा नसून ती खरी आहे, याचेही काही संकेत मिळत आहेत. नुकतेच विराट आणि अनुष्का दोघेही इटलीला रवाना झालेत. विराट दिल्लीच्या विमानतळावरून रवाना झाला तर अनुष्का मुंबईतून रवाना झाली आहे. ते दोघे इटलीतील मिलान येथे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण अनुष्कासोबत तिचे अख्खे कुटुंब आणि शर्मा कुटुंबाचे नेहमीचे पंडितजी देखील इटलीला रवाना झाले आहेत. तसेच अनुष्काच्या वडिलांनी शेजारच्यांना फोन करून या लग्नाचे निमंत्रण दिल्याचेही म्हटले जात आहे. अर्थात ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचू नये, अशी विनंतीही शेजाऱ्यांना करण्यात आली आहे. 
अनुष्का आणि विराट १२ तारखेला इटलीमध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट टीम सध्या श्रीलंकेसोबत मॅच खेळत असल्याने भारतीय क्रिकेट टीममधील विराटचे मित्र या लग्नाला उपस्थिती लावू शकणार नाहीयेत. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटर युवराज सिंग यांना विराटने लग्नाचे खास आमंत्रण दिले असल्याचे कळतेय. त्यामुळे क्रिकेट जगतातील केवळ हे दोनच क्रिकेटर अनुष्का आणि विराटच्या लग्नाला उपस्थित राहाणार असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर अनुष्काने देखील बॉलिवूडमधील तिच्या अगदी जवळच्या लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले असल्याचे म्हटले जात आहे. अनुष्काने बँड बाजा बरात या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा, अभिनेता आमिर खान, शाहरुख खान आणि दिग्दर्शक मनीष शर्मा केवळ इतक्याच लोकांना अनुष्काने निमंत्रण दिले असल्याची चर्चा आहे. 
इटलीमध्ये लग्न केल्यानंतर अनुष्का आणि विराट त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन देणार असल्याची बातमी झुम टिव्हीने दिली आहे. झुमच्या बातमीनुसार हे रिसेप्शन २१ अथवा २२ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. 

Also Read : अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लगीनघाई! हा घ्या पुरावा!!
Web Title: Anushka Sharma and Virat Kohli will be the only two cricketer to be present
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.