Another teaser of 'angel'! Sweat of good luck !! | ​‘परी’चा आणखी एक टीजर! भल्याभल्यांना फुटेल घाम!!

‘एन एच10’ आणि ‘फिल्लोरी’नंतर अनुष्का शर्मा आपल्या प्रॉडक्शनचा ‘परी’ हा तिसरा सिनेमा घेऊन येते आहे. विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर अनुष्काचा हा पहिला चित्रपट आहे. या हॉरर चित्रपटाचा आणखी एक नवा टीजर आज रिलीज झाला. यात अनुष्काचा अंदाज अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या टीजरमध्ये अनुष्का आपल्या प्रियकराची मानगुट पकडताना दिसतेय. टीजरच्या अखेरच्या दृश्यात अनुष्का ज्या साखळदंडाने बांधलेली दिसतेयं, ती कुणी दुसरी नसून एक आत्मा आहे. ‘परी’चा हा टीजर तुमच्या अंगावर काटे आणल्याशिवाय राहणार नाही. साहजिकच या टीजरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.
 या चित्रपटात अनुष्कासह   रिताभरी चक्रवर्ती आणि रजत कपूर लीड रोलमध्ये आहेत. येत्या २ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या चित्रपटाबद्दल अनुष्का अतिशय उत्सूक आहे.गतवर्षी अनुष्काचे ‘फिल्लोरी’ आणि ‘जब हेरी मेट सेजल’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. पण या दोन्ही चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. त्यामुळे आपल्या या चित्रपटाकडून अनुष्काला मोठ्या अपेक्षा आहेत.अनुष्का या अपेक्षांवर किती खरी उतरते ते आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. 

ALSO READ : अंगाचा थरकाप उडवणारा आहे अनुष्का शर्माच्या ‘परी’चा नवा टीजर!

अनुष्का या चित्रपटाची को-प्रोड्यूसर आहे. अनुष्का तिचा भाऊ करनेश शर्मासोबत हा चित्रपट बनवते आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बंगाली स्टार परमब्रता चॅटर्जी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.   तूर्तास अनुष्का ‘परी’च्या शूटींगसोबतच आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्येही व्यस्त आहे. यात ती शाहरूख खान आणि कॅटरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्येही अनुष्का  एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. गत डिसेंबर महिन्यात अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले.  
Web Title: Another teaser of 'angel'! Sweat of good luck !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.