Another complaint against Sunny Leone filed; Pornography is promoted! | सनी लिओनीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पोर्नोग्राफीला प्रमोट केल्याचा आरोप!

अभिनेत्री सनी लिओनी हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, सनीविरोधात चेन्नई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाºया सनीविरोधात पोर्नोग्राफीला प्रमोट केल्याचा आरोप करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार सामाजिक कार्यकर्ते एमी एका एनोच मोसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमीने आरोप केला की, सनी पोर्नोग्राफीला प्रमोट करीत आहे. ही आपल्या देशाची संस्कृती संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सनीच्या विरोधात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा नाही, तर यापूर्वीही अशाप्र्रकारचे बरेचसे गुन्हे तिच्यावर दाखल झाले आहेत. 

टीव्ही शो बिग बॉसनंतर सनीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. बºयाचशा चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसली, त्याचबरोबर अनेक आयटम नंबर्सही तिने केले. दरम्यान, सनीच्या विरोधात फिर्याद देणाºया एमीने सांगितले की, ‘सनी लिओनी पोर्नोग्राफीला प्रमोट करीत आहे. तिचे हे कृत्य कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे देशाची संस्कृती विनाशाकडे जात असून, समाजाला नैतिक पतनाकडे घेऊन जात आहे. 

ALSO READ : सनी लिओनीचा ‘ढाई किलो का हाथ’ सोशल मीडियावर झाला व्हायरल, तुम्हीही पाहाच!

सध्या सनी तिच्या तामीळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इमेज बदलण्यासाठी तिने बॉलिवूडमधून साउथ इंडस्ट्रीत आपला मोर्चा वळविला आहे. सध्या ती ‘वीरमादेवी’ या तामीळ चित्रपटाची शूटिंग करीत आहे. या चित्रपटात ती वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वीरमादेवी एक यौद्धा राजकुमारी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटासंबंधी एक पोस्टर रिलीज करण्यात आले. आपल्या भूमिकेसाठी सनी सध्या तलवारबाजी आणि घोडस्वारी शिकताना दिसत आहे. 

त्याचबरोबर सनी लवकरच मॅन वर्सेज वाइल्ड विद सनी लिओनी या शोमध्ये बघायवास मिळणार आहे. ती या शो ला होस्ट करताना दिसेल. तिचा हा शो डिस्कवरी जीत या चॅनेलवर प्रसारित केला जाणार आहे. सनी या अगोदर एम टीव्हीवरील स्प्लिट्सव्हिला या शो ला होस्ट करताना बघावयास मिळाली. हा शो ती अभिनेता रणविजय सिंग यांच्यासोबत होस्ट करणार आहे. 
Web Title: Another complaint against Sunny Leone filed; Pornography is promoted!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.