-तर एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतसोबतही काम करणार अंकिता लोखंडे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 11:23 AM2019-01-23T11:23:47+5:302019-01-23T11:24:19+5:30

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपट रिलीज व्हायला काही दिवस उरले आहेत आणि अशात बॉलिवूडची एकही संधी सुटता कामा नये, असे अंकिताला झालेय. म्ह

Ankita Lokhande will work with her ex-boyfriend Sushant Singh Rajput | -तर एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतसोबतही काम करणार अंकिता लोखंडे!!

-तर एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतसोबतही काम करणार अंकिता लोखंडे!!

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा ‘पवित्र रिश्ता’ तुटला तेव्हा, अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागल

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपट रिलीज व्हायला काही दिवस उरले आहेत आणि अशात बॉलिवूडची एकही संधी सुटता कामा नये, असे अंकिताला झालेय. म्हणूनचं तर एक्स- बॉयफ्रेन्डसोबतही काम करायला ती तयार आहे.


होय, एक्स बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतसोबत काम करण्याची संधी मिळाली तर ती स्वीकारशील का? असा प्रश्न अंकिताला विचारण्यात आला आणि या प्रश्नावर कुठलेही आढेवेढे न घेता अंकिताने थेट होकार दिला. मी एक अभिनेत्री आहे आणि अभिनेत्री या नात्याने माझ्याकडे नकाराचा पर्याय नाही. स्क्रिप्ट चांगली असेल तर मी त्याच्यासोबत नक्की काम करेल, असे ती म्हणाली. साहजिकचं अंकिताच्या या उत्तराने भविष्यात तिची व सुशांतची जोडी स्क्रिनवर पाहण्याची चाहत्यांची आशा पल्लवित झाली.


सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा ‘पवित्र रिश्ता’ तुटला तेव्हा, अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागले. इतके की दोघांचे एकमेकांशिवाय पानही हलेना. सुशांत व अंकिता अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक काही तरी बिनसले आणि हे नाते ब्रेकअपपर्यंत पोहोचले. या ब्रेकअपनंतर अंकिता डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या आल्या. तिला सावरायला बराच वेळ लागला. पण ती सगळ्यांतून सावरली.
 लवकरच अंकिता ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.  यात ती झलकारी बाईंची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Ankita Lokhande will work with her ex-boyfriend Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.