Anjali Patil made a big disclosure about Rajinikanth's 'Kala' film! | अंजली पाटीलने रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाविषयी केला मोठा खुलासा!

मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. अंजलीचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आॅस्करला पाठविल्यानंतर अंजली जबरदस्त लाइमलाइटमध्ये आली आहे. त्यातच ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करीत असल्याने अंजलीचे नशीब ‘सातवे आसमान पे’ असेच म्हणावे लागेल. असो, अंजलीने तिच्या आगामी तामीळ ‘काला’ या चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केले. अंजलीने म्हटले की, ‘काला या चित्रपटात काम करण्यास केवळ याकरिता होकार दिला की, यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भूमिका आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा आपण भाग बनत आहोत, याच विचाराने मी या चित्रपटाला होकार दिला आहे. 

चित्रपटात अंजली एक प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. पा. रंजीत दिग्दर्शित या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत एका दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. दरम्यान, अंजलीने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, ‘जेव्हा मी चित्रपटासाठी करार केला तेव्हा मला माहीत होते की, हा तो चित्रपट नाही, ज्यामध्ये मला माझ्यातील योग्यता सिद्ध करावी लागणार आहे. मी केवळ रजनीकांत यांची भूमिका असलेल्या चित्रपटाचा आपण एक भाग बनत असल्याच्या उत्साहाने चित्रपटाला होकार दिला आहे. या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा मला अनुभव घ्यायचा होता, असेही अंजलीने सांगितले. सुपरस्टार रजनीकांतसोबतच्या काम करण्याच्या अनुभवाविषयी अंजलीने म्हटले की, ‘हे परीकथेप्रमाणे आहे. ते खूपच चांगले आहेत. तुम्ही अशा लोकांना केवळ परीकथेमध्येच बघू शकता. त्यांचा आजूबाजूला राहणाºया सर्व लोकांना सहवास हवाहवासा आहे. त्यामुळे तामीळ इंडस्ट्रीचा भाग बनल्याचा सध्या मी आनंद घेत असल्याचे अंजली म्हणाली. दरम्यान, ‘काला’ या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत, अंजली पाटील यांच्यासह नाना पाटेकर, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी आणि समुथिरकनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती धनुष करीत आहे. 
Web Title: Anjali Patil made a big disclosure about Rajinikanth's 'Kala' film!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.