Anil Kapoor's tattoo for both girls' name | ​अनिल कपूरच्या दोन्ही मुलींच्या नावाचा टॅटू पाठीवर मिरवणारा ‘हा’ तरूण आहे तरी कोण?

अनिल कपूरच्या दोन्ही मुली सोनम कपूर आणि रिया कपूर सध्या ‘वीरे द वेडिंग’च्या शूटींगमध्ये बिझी आहेत. दोघीही तिकडे दिल्लीत आहेत आणि इकडे एका हॅण्डसम तरूणाने अनिलच्या या दोन्ही मुलींच्या नावाचा टॅटू आपल्या पाठीवर गोंदवला आहे. आता हा तरूण कोण? हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला लागली असेल तर हा तरूण दुसरा तिसरा कुणी नसून हर्षवर्धन कपूर आहे. होय, म्हणजे सोनम व रियाचा भाऊ.
ALSO READ : Trouble in paradise : ​हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खानचे ब्रेकअप?

हर्षवर्धनने आपल्या दोन्ही बहीणींचे नाव आपल्या पाठीवर गोंदवले आहे. ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करून चुकलेला हर्षवर्धन आपल्या दोन्ही बहिणींवर प्रचंड पे्रम करतो. बहिणीसोबतचे फोटो तो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. गुरुवारी हर्षवर्धनने आपला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाआहे. या व्हिडिओ तो टीशर्ट घालताना दिसतो आणि पाठोपाठ त्याच्या पाठीवर गोंदवलेले बहीणीच्या नावांचा टॅटूही दिसतो. अर्थात हा व्हिडिओ बराच जुना आहे. ‘थ्रोबॅक’ या हॅशटॅगसह त्याने तो शेअर केला आहे. शिवाय हा व्हिडिओ शेअर करताना हर्षवर्धनने आपल्या चाहत्यांना व्हॅकेशन प्लानची माहितीही दिली आहे. ‘लवकरच व्हॅकेशनवर जातोय. मी लवकर परतेल, हे सांगणे इथे योग्य ठरेल,’ असे त्याने लिहिलेय. 
लवकरच हर्षवर्धन अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये लीड रोल साकारताना दिसणार आहे. याशिवाय  ‘भावेश जोशी’ हा त्याचा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हर्षवर्धनचे नाव सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्यासोबत जोडले जात आहे. सारा व हर्षवर्धन बरेचदा एकत्र दिसलेत. अर्थात मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपची बातमीही आपण वाचलीयं.
Web Title: Anil Kapoor's tattoo for both girls' name
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.