Anil Kapoor's family will now have an entry in Bollywood | ​अनिल कपूरच्या कुटुंबातील आता ही व्यक्ती करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर काहीच दिवसांत जान्हवीचा वाढदिवस होता. जान्हवीला तिच्या आईची कमतरता भासू नये यासाठी तिच्या घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला होता. त्यावेळी त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्यावेळी या फोटोंमध्ये संजय कपूरची मुलगी शनाया पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच शनायाच्या दिसण्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यातच सोनमच्या लग्नात देखील शनाया खूपच सुंदर दिसली होती. आता शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण केव्हा करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 
शनाया कपूर सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर तिचे फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण तिला फॉलो करतात. सोशल मीडियावर तिचा फॅन क्लब देखील तयार झाला आहे. त्यामुळे शनायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे अशी तिच्या फॅन्सची इच्छा आहे. डिएनए या वर्तमानपत्राला शनायाचे वडील अभिनेता संजय कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये शनाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाविषयी विचारले असता संजयने सांगितले की, सध्या तिचे त्याच्यावरच काम सुरू आहे. पण ती बॉलिवूडमध्ये नक्की कधी येईल याबाबत मी सांगू शकत नाही. कारण तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तिला अभिनय करण्याची आवड आहे. पण ती खूपच लहान आहे. सध्या तरी तिने कोणताही चित्रपट साइन केलेला नाहीये. 
१८ वर्षीय शनाया कपूरची गणना बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार डॉटर्समध्ये केली जाते. शनायाला नेहमीच शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या कपूरसोबत बघण्यात येते. ती तिची चुलत बहीण सोनम कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर आणि अंशुला कपूरच्याही खूप क्लोज आहे.

shanaya kapoor

Also Read : सोनम कपूरच्या लग्नात भाव खाऊन गेली ‘ती’,लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण ?
Web Title: Anil Kapoor's family will now have an entry in Bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.