सोनम कपूरच्या या चित्रपटाबाबत अनिल कपूरने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 05:17 PM2019-05-20T17:17:13+5:302019-05-20T17:21:16+5:30

सोनमच्या एका चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा अनिल कपूरने केला आहे.

Anil Kapoor on women-centric films: No male actor wanted to do Khoobsurat opposite Sonam Kapoor | सोनम कपूरच्या या चित्रपटाबाबत अनिल कपूरने केला मोठा खुलासा

सोनम कपूरच्या या चित्रपटाबाबत अनिल कपूरने केला मोठा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देखुबसुरत या चित्रपटासाठी नायक शोधणे हे आमच्यासाठी खूपच कठीण काम होते. कारण कोणीच या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हते. आम्ही चांगल्या नायकाच्या शोधात असताना रियाने (रिया कपूर) मला फवादबद्दल सांगितले आणि त्यांच्या कामाचे काही व्हिडिओ दाखवले.

सोनम कपूरचा खुबसुरत हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील सोनमच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक वर्षांनी या चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे आणि हा खुलासा दुसरा कोणी नव्हे तर सोनमचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी केला आहे.

खुबसुरत या चित्रपटात सोनम कपूर आणि फवाद खान मुख्य भूमिकेत होते. पण या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी या चित्रपटात नायक कोण असणार असा प्रश्न या चित्रपटाच्या टीमला पडला होता. कारण या चित्रपटात नायकाची भूमिका स्वीकारायला कोणीच तयार नव्हते असे अनिल कपूरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. कोणत्याही नायकाने या चित्रपटात काम करण्यास होकार न देण्यामागे एक खास कारण असल्याचे अनिलने सांगितले आहे. अनिलने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, खुबसुरत या चित्रपटासाठी नायक शोधणे हे आमच्यासाठी खूपच कठीण काम होते. कारण कोणीच या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हते. आम्ही चांगल्या नायकाच्या शोधात असताना रियाने (रिया कपूर) मला फवादबद्दल सांगितले आणि त्यांच्या कामाचे काही व्हिडिओ दाखवले. त्यानंतर फवादचे ऑडिशन घेण्यात आले. त्याचे काम आवडल्याने या चित्रपटासाठी त्याची निवड करण्यात आली.

रिया ही अनिल कपूरची लहान मुलगी असून खुबसूरत या चित्रपटाची निर्मिती देखील तिनेच केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अनिल आणि रियाला स्त्री केंद्रित चित्रपट बनवायचा आहे. रियाला स्त्रियांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायला आवडतात आणि ते चित्रपट ती खूप चांगल्याप्रकारे बनवते असे अनिलचे म्हणणे आहे. 

अनिल कपूरने या मुलाखतीत त्याच्या करियरबाबत देखील एक गोष्ट सांगितली आहे. जुदाई, लाडला, बेटा यांसारख्या चित्रपटात नायिकची भूमिका नायकाइतकीच महत्त्वाची असल्याने या चित्रपटांमध्ये काम करू नये असा सल्ला अनिलला अनेकांनी दिला होता. 

Web Title: Anil Kapoor on women-centric films: No male actor wanted to do Khoobsurat opposite Sonam Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.