अनिल कपूरने केली लेकाच्या कपाटातील ‘या’ वस्तूची चोरी, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:58 PM2019-06-27T12:58:04+5:302019-06-27T12:59:55+5:30

अनिल कपूर अभिनयापेक्षा त्याच्या लूक्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बराच अ‍ॅक्टिव्ह असतो. चाहत्यांसाठी रोज नवे काही तो शेअर करतो. सध्या अनिल त्याच्या लेकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

anil kapoor theft harshvardhan kapoor shoe son posted video on instagram |  अनिल कपूरने केली लेकाच्या कपाटातील ‘या’ वस्तूची चोरी, पाहा व्हिडीओ

 अनिल कपूरने केली लेकाच्या कपाटातील ‘या’ वस्तूची चोरी, पाहा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देअनिलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो ‘मलंग’ या चित्रपटात दिसणार आहे.

अनिल कपूर अभिनयापेक्षा त्याच्या लूक्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बराच अ‍ॅक्टिव्ह असतो. चाहत्यांसाठी रोज नवे काही तो शेअर करतो. सध्या अनिल त्याच्या लेकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, अनिलचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल कपूर ‘चोरी’ करताना दिसतोय. हर्षवर्धनच्या शूज कलेक्शनमधील काही बूट काढून तो नोकराच्या हाती देत आहे. एक दोन नाही तर चार-पाच शूजच्या जोड्या तो घेतोय. हर्षवर्धनने या व्हिडीओला कॅप्शन देताना पापा अनिल कपूर यांना ‘थेफ्ट’ म्हटले आहे.‘बाबांनी केलेली ही चोरी मला अजिबातच आवडली नाहीये पण तरीही माझे सगळेच बूट बाबांच्या पायांवर शोभून दिसतात,’ असे त्याने लिहिले आहे.


यापूर्वीही हर्षवर्धनने अशीच एक पोस्ट शेअर केली होती. यात अनिल व हर्षवर्धन हे दोघे बापलेक एकसारखे शूज घालून दिसले होते. ‘बाबा नेहमी तक्रार करतात की, मी खूपच बूटांची खरेदी करतो, पण मग नंतर स्वत:च ते बूट घालून स्टाईल मारतात,’ असे त्याने गमतीने लिहिले होते.


अनिल कपूर एक कूल पापा म्हणून ओळखला जातो. सोनम, हर्षवर्धन, रिया या सगळ्यांसोबत तो अगदी मित्रासारखा वागतो. हर्षवर्धनच्या या ताज्या पोस्टवरून तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल.


अनिलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो ‘मलंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य राय कपूर लीड रोलमध्ये आहे. याशिवाय ‘तख्त’ या करण जोहरच्या पीरियड ड्रामातही तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हर्षवर्धनचे म्हणाल तर सोनम कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत हर्षवर्धननेही बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. पण हर्षवर्धनने केलेले दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत.  

Web Title: anil kapoor theft harshvardhan kapoor shoe son posted video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.