अन् माधुरी दीक्षितला आले रडू! अनिल कपूरने ऐकवला धम्माल किस्सा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:10 PM2019-02-18T15:10:31+5:302019-02-18T15:11:25+5:30

‘टोटल धमाल’चे दणक्यात प्रमोशन सुरु आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी व अनिलने कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली आणि मग काय, या सदाबहार जोडीने अनेक धम्माल किस्से ऐकवले.

anil kapoor revealed secret when madhuri dixit cried on set cancel shooting | अन् माधुरी दीक्षितला आले रडू! अनिल कपूरने ऐकवला धम्माल किस्सा!!

अन् माधुरी दीक्षितला आले रडू! अनिल कपूरने ऐकवला धम्माल किस्सा!!

googlenewsNext
ठळक मुद्देहा किस्सा ऐकवताना माधुरी व अनिल दोघेही जोरजोरात हसू लागले, तशीच कपिल शर्माच्या शोमध्येही खसखस पिकली.

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये आत्तापर्यंत १७ चित्रपटांत एकत्र काम केले आहे. या जोडीचा एकत्र असा १८ वा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘टोटल धमाल’. तूर्तास ‘टोटल धमाल’चे दणक्यात प्रमोशन सुरु आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी व अनिलने कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली आणि मग काय, या सदाबहार जोडीने अनेक धम्माल किस्से ऐकवले.

असाच एक किस्सा म्हणजे, माधुरीच्या सेटवरच्या रडण्याचा. अनिल कपूरने माधुरीचा हा किस्सा शेअर केला. ‘आजही एक गाणे ऐकतो तेव्हा मला त्यावेळचा एक किस्सा हमखास  आवडतो. ते गाणे म्हणजे, ‘पुकार’ चित्रपटातील ‘किस्मत से तुम हमको मिले हो...’. या गाण्याच्या शूटवेळी इतकी थंडी होती की, पारा शून्याखाली गेला होता. मी तर जॅकेट,कोट, मफलर असे सगळे घातले होते. पण माधुरी एका पातळ अशा शिफॉन साडीत होती. माधुरी अक्षरश: थंडीने कापत होती...’ असे अनिलने सांगितले आणि तो हसत सुटला. त्यामुळे माधुरीने पुढचा किस्सा ऐकवला.

तिने सांगितले की, इतकी थंडी होती की, त्या गारठ्याने माझा चेहरा निळा पडू लागला होता. अचानक वारे वाहणे थांबले अन् माझा चेहरा आनंदाने खुलला. पण अचानक अनिल ओरडू लागला. वारा वाहाणेय थांबले, मजा येत नाहीये. चॉपर खाली आणा...वाºयाने माधुरीची साडी उडेल, तेव्हाच मजा येईल. मग काय, चॉपर खाली आले आणि त्या  वा-याने मी पुन्हा गारठले. मी अक्षरश: रडू लागले. जोरजोरात ओरडू लागले. मी हे अजिबात करणार नाही, असे मी सांगून टाकले.
हा किस्सा ऐकवताना माधुरी व अनिल दोघेही जोरजोरात हसू लागले, तशीच कपिल शर्माच्या शोमध्येही खसखस पिकली.

Web Title: anil kapoor revealed secret when madhuri dixit cried on set cancel shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.