अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर ही अलीकडे तिचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकली. या शानदार विवाह सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ आपण पाहिलेच. आता सोनमच्या लग्नानंतर अनिल कपूरच्या घरी पुन्हा एकदा सनईचौघडा वाजण्याची शक्यता आहे. होय, अनिल कपूरची लहान मुलगी रिया कपूर हिच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहे. अलीकडे अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले. या फॅमिली डिनरचे फोटो समोर आलेत आणि रियाच्या लग्नाच्या शक्यतांना जोर चढला.‘रेस3’च्या यशानंतर अनिल कपूर आपल्या कुटुंबाला डिनर डेटवर घेऊन गेला. पत्नी सुनीता व मुलगी रियासोबत तो वांद्रयातील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत दिग्दर्शक करण बुलानी हाही होता. होय, तोच तो रियाचा कथित बॉयफ्रेन्ड करण बुलानी. फॅमिली डिनरमध्ये करणला बोलवणे, यावरून रिया व करणच्या लग्नाच्या शक्यता वर्तवली जात आहे.रिया दीर्घकाळापासून करणला डेट करत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अनेकदा करण अनिल कपूरच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसला आहे.
करण बुलानी दिग्दर्शक आहे. ‘आयशा’ आणि ‘वेक अप सिड’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे. ‘द आॅडिशन’ ही शॉर्ट फिल्म त्याने दिग्दर्शित केली आहे. अनेक टीव्ही शोच्या प्रॉडक्शन टीममध्ये त्याने काम केले आहे.ALSO READ : तुम्हाला माहिती आहे सोनम कपूरचा होणारा नवरा आनंद अहुजा कोण आहे तो ?

सोनमच्या लग्नादरम्यान रिया व करणने आपले नाते जगजाहिर केल्याचे मानले जाते. करणने रियासोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये ‘माय गर्ल’ असे त्याने लिहिले होते. त्यापूर्वी फॅशन डिझाईनर संदीप खोसला व अबु जानीच्या भाचीच्या लग्नात दोघांनाही एकत्र पाहिले गेले होते. केवळ इतकेच नाही तर अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नातही करण सहभागी झाला होता. याशिवाय रियाची आई सुनीता कपूर हिच्या लंडनमधील बर्थ डे सेलिब्रेशनवेळीही तो रियासोबत होता.

Web Title: Anil Kapoor meets Riya's boyfriend? After Sonam's wedding, Kapoor's family will play again in the sunny clime?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.