सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सिनेमा पोहोचला ऑस्कर  लायब्ररीत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 11:17 AM2019-02-08T11:17:11+5:302019-02-08T11:19:46+5:30

शैली चोपडा धर दिग्दर्शित ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण समीक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. आता या चित्रपटाबद्दल खास बातमी आहे.

anil kapoor and sonam kapoor film will be a part of oscars library | सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सिनेमा पोहोचला ऑस्कर  लायब्ररीत!!

सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सिनेमा पोहोचला ऑस्कर  लायब्ररीत!!

googlenewsNext
ठळक मुद्देएक कधीही न पाहिलेली प्रेमकथा म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने  समलैंगिक नात्याला मान्यता दिली. नेमकी ही वेळ साधून समलैंगिक नात्यावरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ प्रदर्शित झाला.

शैली चोपडा धर दिग्दर्शित ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण समीक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव, जुही चावला यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाच्या बोल्ड विषयाची बरीच चर्चा झाली. समलैंगिक नात्यासारख्या चाकोरीबाहेरचा विषय मांडत या चित्रपटाने दाद मिळवली. आता या चित्रपटाबद्दल खास बातमी आहे. होय, चित्रपटाच्या स्क्रिनप्ले अर्थात पटकथेला अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्स अर्थात ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळणार आहे.


एक कधीही न पाहिलेली प्रेमकथा म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने  समलैंगिक नात्याला मान्यता दिली. नेमकी ही वेळ साधून समलैंगिक नात्यावरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ प्रदर्शित झाला. सोनम कपूरने या चित्रपटात लेस्बियनची भूमिका साकारली आहे. आपल्या रूढीप्रिय कुटुंबासमोर स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यात तिला ब-याच संघर्षातून जावे लागते. दाक्षिणात्य अभिनेत्री रेजीना कसांड्रा हिने सोनमच्या प्रेमिकेची भूमिका साकारली आहे.
‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ३ कोटी ३० लाख रूपयांची कमाई केली. यानंतर शनिवार व रविवारी अनुक्रमे ४.६५ कोटी व ५.५८ कोटींचा गल्ला जमवला. पण यानंतर चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली . एकंदर काय तर प्रेक्षकांचा चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही . पण ऑस्कर लायब्ररीत चित्रपटाच्या पटकथेला स्थान मिळणे नक्कीच गौरवास्पद आहे

Web Title: anil kapoor and sonam kapoor film will be a part of oscars library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.