... And Jairan Khan got a mini-heart attack, what's the matter of the episode! | ...अन् जरीन खानला आला मिनी हार्ट अटॅक, वाचा काय आहे प्रकरण!

अभिनेत्री जरीन खान हिचा ‘अक्सर-२’ हा चित्रपट उद्या रिलीज होणार आहे. ‘वीर’मध्ये सलमान खानची अभिनेत्री बनलेल्या जरीनने या चित्रपटात खूपच हॉट सीन दिले आहेत. चित्रपटाची शूटिंग मॉरिशसच्या रम्य वातावरणात झाली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला यांची जरीन खानसोबत खूपच चांगली मैत्री जमली आहे. त्यामुळे चित्रपटात या सर्वांची केमिस्ट्री बघण्यासारखी असेल. त्याचबरोबर या तिघांनीही चित्रपटादरम्यान खूप मस्ती केली. चित्रपटाच्या क्लायमॅक्स शूटदरम्यान गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला यांनी जरीन खानसोबत असा काही प्रॅँक खेळला की, तिला मिनी हार्ट अटॅक आला. 

क्लायमॅक्स शूटदरम्यान गौतम आणि अभिनवने जरीनसोबत प्रॅँक खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोघांनी जरीनला प्रचंड घाबरविले. त्याचे झाले असे की, जरीन तिच्या व्हॅनमध्ये बसून, तिचे डायलॉग वाचत होती. तेव्हा अभिनव तिच्याकडे पळत आला अन् तिला गौतमचा अपघात झाल्याचे सांगितले. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचेही जरीनला सांगण्यात आले. हे एकताच जरीनला धक्का बसला, ती तिच्या व्हॅनमधून पळतच गौतमला बघण्यासाठी निघाली. गौतम जमिनीवर पडलेला होता. त्याच्या चेहºयावर रक्तासारखा लाल रंग दिसत होता. गौतमला या अवस्थेत बघून जरीन खूप जोरात ओरडली. तिला चक्कर येतात की काय अशी तिची अवस्था झाली होती. जरीनची ही अवस्था बघून गौतम हसत-हसत उठला. मात्र यासर्व प्रकारामुळे जरीन खानला मिनी हार्ट अटॅक आला. त्यामुळे ती दोघांवर अशी काही संतापली की, दोघेही तिची माफी मागू लागले. त्यानंतर तिघेही हसायला लागले. ‘अक्सर-२’ला अनंत नारायण महादेवन यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट उद्या रिलीज होणार असून, यामध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतही बघावयास मिळणार आहे. 
Web Title: ... And Jairan Khan got a mini-heart attack, what's the matter of the episode!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.