- तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 04:06 PM2019-06-02T16:06:06+5:302019-06-02T16:07:33+5:30

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची.

ananya pandey and suhana khan shot for my name is khan with shah rukh khan | - तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!

- तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘माय नेम इज खान’मधून सुहानाचा डेब्यू होऊ शकला नाही. पण ती बॉलिवूडमध्ये येण्यास प्रचंड उत्सुक आहे, असेही अनन्याने यावेळी सांगितले.

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची. होय, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण अद्याप सुहानाचा डेब्यू ठरलेला नाही. खरे तर ९ वर्षांपूर्वीच सुहानाचा डेब्यू होणार होता. तो सुद्धा पापा शाहरुखच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातून. केवळ सुहानाच नाही तर अनन्याही या चित्रपटातून डेब्यू करणार होती. पण करण जोहरमुळे असे घडू शकले नाही. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.


ताज्या मुलाखतीत खुद्द अनन्या यावर बोलली. तिने सांगितले की, ‘मी आणि सुहाना आम्ही दोघीही ‘माय नेम इज खान’च्या सेटवर गेलो होतो. अमेरिकेत एका सीनचे शूट सुरू होते. करणला या सीनमध्ये रस्त्यावर फिरणारे आणि फ्रेम भरू शकणा-या काही लोकांची गरज होती.  आम्हालाही या सीनमध्ये येण्यास सांगितले गेले. त्या सीनसाठी 7-8 टेक झालेत आणि प्रत्येक टेकमध्ये आम्ही ओव्हरअ‍ॅक्टिंग केली. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी व सुहाना आम्ही दोघीही कमालीचे उत्सुक होतो. पण आम्ही चित्रपट बघायला गेलो तेव्हा नेमका आमचा सीन गायब होता. करणने तो सीन कट केला होता. त्याक्षणी आम्हाला झालेले दु:ख आम्हालाच ठाऊक ...’
‘माय नेम इज खान’मधून सुहानाचा डेब्यू होऊ शकला नाही. पण ती बॉलिवूडमध्ये येण्यास प्रचंड उत्सुक आहे, असेही अनन्याने यावेळी सांगितले.

Web Title: ananya pandey and suhana khan shot for my name is khan with shah rukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.