Anand L. Rai's film will look something like Shah Rukh Khan! Shared First Look !! | ​आनंद एल रायच्या चित्रपटात काहीसा असा दिसेल शाहरूख खान! शेअर केले फर्स्ट लूक!!

वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केल्यानंतर किंगखान शाहरूख खान पुन्हा एकदा परतला आहे. होय, आम्ही बोलतोयं, ते दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाचे टायटल ठरलेले नसले तरी शूटींग मात्र वेगात सुरु आहे. मुंबईत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटाबद्दल शाहरूखच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे आणि असायलाही हवी. कारण शाहरूख या चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. होय, या चित्रपटात शाहरूख एका बुटक्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरूखच्या फर्स्ट लूकची अनेकांना प्रतीक्षा होती. अखेर चाहत्यांचे मन राखत शाहरूखने चित्रपटाची एक झलक आज शेअर केली.


शाहरूखने आपल्या  ट्वीटर अकाऊंटवर आपल्या या चित्रपटाच्या सेटवरचा स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. खरे तर हा फोटो प्रथमदर्शनी बघता, आनंद एल राय यांच्या सेटवरचा आहे, हे कळत देखील नाही. पण शाहरूखने दिलेले कॅप्शन वाचल्यावर हा फोटो चित्रपटाच्या सेटवरचा आहे, हे कळून येते. या फोटोत शाहरूखने काळ्या रंगाचे शर्ट घातलेयं आणि नेहमीप्रमाणे तो रोमॅन्टिक अंदालात आहे. खरे तर हा फोटो शेअर करण्यामागे शाहरूखकडे एक खास कारणही आहे. हे खास कारण काय तर  ट्वीटरवर शाहरूखच्या फॉलोवर्सची संख्या ३० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शाहरूखचे अलीकडे आलेले चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालले नाहीत. पण म्हणून त्याच्या चाहत्यांची संख्या जराही कमी झालेली नाही. उलट दिवसांगणिक ती वाढले आहे.

ALSO READ: ​‘ही’ चर्चा खरी असेल तर शाहरूख खान देणार आणखी एक फ्लॉप!!

शाहरूख या चित्रपटात बुटक्या व्यक्तीच्या रूपात दिसणार असल्याचे मानले जात आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. या चित्रपटात कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. यात ती ‘मेरी जान’ नामक पात्र साकारणार आहे. आधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. त्याला ही कथा प्रचंड आवडली होती. पण अचानक सलमानने या चित्रपटाला नकार कळवला आणि हा चित्रपट शाहरूखकडे आला.

Web Title: Anand L. Rai's film will look something like Shah Rukh Khan! Shared First Look !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.