Amrapali Dubey's ballet dance; Within a few hours the song got 30 million views! | आम्रपाली दुबेचा बॅले डान्स बघून चाहते झाले क्रेझी; काही तासांतच गाण्याला मिळाले ३० लाख व्ह्यूज !

भोजपुरी चित्रपटांमध्ये यू-ट्यूब क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या आम्रपाली दुबेचे नवे प्रमोशनल सॉँग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या धमाकेदार गाण्यात आम्रपालीच्या बॅले डान्सचे चाहत्यांकडून चांगलेच कौतुक केले जात आहे. चाहत्यांमध्ये तर या गाण्याची तुफान क्रेझ बघावयास मिळत आहे. ‘लव्ह केले लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटातील आम्रपालीचे ‘तोहारे खातिर’ हे प्रमोशनल सॉँग नुकतेच यू-ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात आम्रपाली चक्क बॅले डान्स करताना बघावयास मिळत आहे. चाहत्यांकडून या गाण्याची बºयाच काळापासून प्रतीक्षा केली जात होती. अखेर ते आज प्रदर्शित झाल्याने त्यास मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. 

या गाण्याच्या शूटिंगचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. खरं तर भोजपुरी चित्रपटांमध्ये आम्रपालीच्या प्रत्येक गाण्याला चाहत्यांकडून तुफान पसंती दिली जात असते. या गाण्यालादेखील चाहत्यांकडून असा पाठिंबा मिळत असून, केवळ तीनच दिवसांत या गाण्याला ३० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. निर्माता सतीश दुबे, सुनील सिंह आणि दिग्दर्शक धीरज ठाकूरच्या ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’मधील प्रमोशनल सॉँगमध्ये भोजपुरी सुलतान राजू सिंह माही आम्रपालीसोबत थिरकताना दिसत आहे. चित्रपटात बाहुबलीची भूमिका साकारत असलेला राजू सिंह माही या चित्रपटात आम्रपाली दुबेच्या चाहत्याच्या भूमिकेत आहे. त्याचाच सिक्वेन्स या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. या गाण्याला अनुज तिवारी यांनी संगीत दिले आहे. तर इंदू सोनाली आणि अनुज तिवारीने हे गाणे गायिले आहे. दरम्यान, या गाण्याच्या शूटिंगदरम्यान बºयाचशा वेब चॅनलने याचे मेकिंग फुटेज अपलोड केले होते. त्यालाही करोडोच्या संख्येने व्ह्यूज मिळाले होते. दिग्दर्शक धीरज ठाकूूर यांनी सांगितले की, आम्रपाली दुबेच्या प्रमोशनल गाण्यामुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात विशाल सिंह, माही खान, नीलू सिंह, सूर्या शर्मा, स्नेहा मिश्रा, अयाज खान, उमेश सिंह, राजकपूर शाही, गोपाल राय व बृजेश त्रिपाठी आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Web Title: Amrapali Dubey's ballet dance; Within a few hours the song got 30 million views!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.