Amitabh Bachchan's first salary was just that | ​केवळ इतकाच होता अमिताभ बच्चन यांचा पहिला पगार

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा मानले जाते. ते गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला देत आहेत. त्यांनी केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावर देखील त्यांचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. साठीनंतर अनेक लोक रिटायरमेंट घेऊन आराम करतात. पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या उतरत्या वयात देखील पा, पिकू, ब्लॅक यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा तर अमिताभ यांच्याशिवाय विचारदेखील होऊ शकत नाहीत. अमिताभ या वयातही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये, जाहिरातीत काम करत आहेत. अमिताभ यांच्या अनेक चांगल्या सवयींबद्दल नेहमीच चर्चा केली जाते. अमिताभ यांना सदी का महानायक असे म्हटले जाते. आज बॉलिवूडमध्ये आपले इतके प्रस्थ निर्माण करूनही ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी तितकीच मेहनत घेतात. दिवसातील कित्येक तास चित्रीकरण करतात आणि विशेष म्हणजे कोणत्याही चित्रीकरणासाठी ते उशिरा पोहोचत नाहीत. कोणत्याही ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचण्याची त्यांची सवय आहे.
आज अमिताभ यांची मिळकत करोडोहून अधिक आहे. त्यांच्या जलसा, प्रतीक्षा या बंगल्यांची आजची किंमत ही २०० कोटींहूनही अधिक असल्याचे म्हटले जाते. तसेच त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या, अनेक घड्याळं, पेन आहेत. आज अमिताभ कोणत्याही कार्यक्रमासाठी, चित्रपटासाठी करोडोहून अधिक पैसे घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, अमिताभ यांची पहिली कमाई ही केवळ काही रुपये होती. अमिताभ यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीसाठी कोलकता येथे राहात असत. तेथील एका शिपिंग फर्म मध्ये ते काम करत होते. त्या शिपिंग कंपनीमध्ये ते एक्झिक्युटिव्ह या पदावर होते. त्यावेळी त्यांना ५०० रुपये इतका पगार मिळत असे. हीच त्यांची आयुष्यातील पहिली कमाई होती. ही नोकरी सोडल्यावर अमिताभ यांनी ब्रोकर म्हणून कोलकतामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना १६८० रुपये मिळत. या पैशांमधून त्यांनी एक सेकंड हँड गाडी देखील घेतली होती. 

Also Read : या ठिकाणी साजरा करणार अमिताभ बच्चन आपला वाढदिवस
Web Title: Amitabh Bachchan's first salary was just that
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.