Amitabh Bachchan's condition deteriorated, doctors team reached Jodhpur | अमिताभ बच्चन यांनी प्रकृती बिघडली, जोधपूरला पोहोचली डॉक्टरांची टीम

अमिताभ बच्चन यांची तब्येत अचानक बिघडली आहे. सध्या ते जोधपूरमध्ये आपला आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ची शूटिंग करतायेत. बिग बींनी आपल्या ब्लॉगवरुन हि माहिती दिली. पहाटे 3 वाजेपर्यंत चित्रपटाची शूटिंग करत होतो आणि 5 वाजता नाश्ता केला. 

आज सकाळी ते डॉक्टरांच्या टीमला भेटणार होते. डॉक्टरांनी जोधपूरमधील वाढती गरमीमध्ये शूटिंग केल्याने अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्या मागचे कारण सांगितले आहे. डॉक्टरांनी अमिताभ यांच्या तब्येतीसंदर्भात पुढचे अपडेट्स लवकरच देऊ असे सांगितले आहे. शूटिंगच्या वेळी अमिताभ यांनी भारी भक्कम वजनाचे कॉस्ट्यूम परिधान केला होता त्यामुळे ही त्यांनी कदाचित थकावट जणावत असेल असे डॉक्टरांचे म्हणणे होते. 

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, ''पहाटेचे 5 वाजलेत, एका नवीन पहाटेची सुरुवात. काही लोक जगण्यासाठी काम आणि मेहनत करत आहेत.  अडचणींचा सामना केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. बराच संघर्ष, निराशा आणि वेदना होतील. तेव्हाच आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील. कधी होतील आणि कधी होणार नाहीत. जेव्हा आपली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तेव्हा आपण अधिक चांगलं करण्याची गरज आहे.''

ALSO READ :  अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दाम्पत्याच्या नावे १० अब्ज रूपयांची संपत्ती!


‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
नुकतीच अमिताभ यांनी एका चिमुकल्या चाहतीशी भेट घेतली. अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या चिमुकल्या चाहतीचे फोटो शेअर केले होता. ‘जलसा’बाहेर जमलेल्या शेकडोंच्या गर्दीतून ही चाहती आत आली. केवळ अमिताभ यांच्याशी हस्तांदोलन करावे, अशी तिची छोटीशी इच्छा होती. अमिताभ अभिवादन करण्यासाठी बंगल्याबाहेर आलेत आणि ‘जलसा’चे दरवाजे उघडले गेलेत. याचक्षणाला ही चिमुकली चाहती गर्दीतून आत आली आणि अमिताभ यांच्या पुढ्यात उभी झाली.  तिने अमिताभ यांना हात हलवून अभिवादन केले. मग काय, अमिताभ यांनी लगेच या चिमुकलीला  जवळ बोलवले आणि तिचे लाडकौतुक केले.
Web Title: Amitabh Bachchan's condition deteriorated, doctors team reached Jodhpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.