अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अवीच्या 'मैं हुआ तेरा' गाण्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:04 PM2018-11-20T13:04:35+5:302018-11-20T13:05:29+5:30

'मैं हुआ तेरा' या म्युझिक व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते.

Amitabh Bachchan unveils Avi's 'Me Hoon Tera' song | अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अवीच्या 'मैं हुआ तेरा' गाण्याचे अनावरण

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अवीच्या 'मैं हुआ तेरा' गाण्याचे अनावरण

googlenewsNext
ठळक मुद्दे अवीतेश श्रीवास्तव उर्फ अवीचे गायक-संगीतकार-कलाकार म्हणून पदार्पण

संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांचा मुलगा अवीतेश श्रीवास्तव उर्फ अवी याच्या 'मैं हुआ तेरा' या पहिल्यावहिल्या गाण्याद्वारे गायक-संगीतकार-कलाकार म्हणून जागतिक संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ज्योर्जियो तुइन्फोर्ट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले गाणे आणि रेमो डी'सुझा यांनी दिग्दर्शित केलेल्या व्हिडीओचे अनावरण बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते.

लॉस एंजल्समधील हॉलिवूड अकादमीचा विद्यार्थी अवी याने शुजीत सरकारच्या 'पिकू' व 'रंगून' चित्रपटात विशाल भारद्वाजला सहकार्य करुन आपल्या कलेचे दर्शन घडविले होते. त्याने अमिताभ बच्चन यांच्या 'जिंदगी' चित्रपटाचे 'आज की बात है' हे शीर्षक गीत फक्त संगीतबद्धच केले नाही, तर 'वन फॉर द वर्ल्ड'मध्ये एकॉन आणि आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत प्रदर्शनदेखील केले असून ग्लोबल साउंड ऑफ पीस या अल्बम शिवाय टी-पेन व फ्रेंच मोंटान सह संगीत कला सादर केलेली आहे.

"हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. माझे वडील या दिवसाची खूप वाट पाहत होते." भावनिक झालेला अवितेश आपल्या गोंडस चेहऱ्यामुळे मिळणाऱ्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स बद्दल सांगताना म्हणाला की, आम्ही अद्याप त्यांचा विचार करीत आहोत. मी माझ्या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून योग्य ब्रेक शोधत आहे, म्हणून मी माझा वेळ घेतो आहे.
 

Web Title: Amitabh Bachchan unveils Avi's 'Me Hoon Tera' song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.