Before Amitabh Bachchan, these actors were asked for the Don movie | ​अमिताभ बच्चन यांच्याआधी या अभिनेत्यांना विचारण्यात आले होते डॉन चित्रपटासाठी

७०च्या दशकातील सिनेमाचा विचार करायचा म्हटलं की आपण एका नव्या जगातच पोहोचतो. या जगात सिनेमाच्या नव्या प्रकाराचा जन्म झाला... मग तो सिनेमा अॅक्श्न असो, थ्रिलर असो की म्युझिकल. असाच एक सिनेमा म्हणजे एक मास्टरपीस, अॅक्शन, थ्रिल, संगीत आणि सुपरहिट संवादाचा अप्रतिम मेळ असलेला, अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांचा डॉन. या सिनेमाने यंदा ४० वर्षांचा मैलाचा टप्पा गाठला आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्समधील सोनी मॅक्स २ ही भारतातील हिंदी सिनेमांची अप्रतिम वाहिनी आपल्या 'कुछ फिल्मों का जादू कभी कम नहीं होता' या विचारसरणीसह सादर करत आहे, हा क्लासिक, अप्रतिम सिनेमा १२ मे २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता. मुंबईतील अंडरवर्ल्डची पार्श्वभूमी असलेली 'डॉन'ची कथा विजय या पात्राभोवती फिरते. विजय हा मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा एक साधा इसम आहे. मात्र, तो हुबेहुब डॉन या बड्या गुंडासारखा दिसतो. डीएसपी डीसिल्व्हा (इफ्तेकार) या पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तो डॉनचे रूप घेण्यास तयार होतो. असे करून तो पोलिसांचा खबऱ्या बनणार असतो आणि त्यातून पोलिसांना या गँगची पाळेमुळे खणून काढण्यास मदत होणार असते.
डॉन या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली, या चित्रपटातील संवाद, या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिेनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला. पण तुम्हाला माहीत आहे का, डॉन या चित्रपटासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बरोट यांची पहिली पसंती अमिताभ बच्चन यांच्या नावाला नव्हती. त्यांनी याआधी या चित्रपटात काम करण्यासाठी धर्मेंद्र, जितेंद्र, देव आनंद यांना विचारले होते. पण या चित्रपटात त्यांनी काम करण्यास मनाई केल्यानंतर अमिताभ बच्चन यांना डॉन या चित्रपटासाठी विचारण्यात आले. अमिताभ बच्चन यांना या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड आवडल्याने ते डॉन या चित्रपटाचा भाग बनले. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत डॉन या चित्रपटाला प्रचंड महत्त्व आहे. 

Also Read : महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातीचा ‘या’ स्टारकिडसोबतचा फोटो होतोय व्हायरल!
Web Title: Before Amitabh Bachchan, these actors were asked for the Don movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.