कौन है छोटा पतला डॉन? ६२ वर्षांपूर्वीच्या या फोटोतील अमिताभ बच्चन यांना ओळखा पाहू?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:52 AM2019-05-20T10:52:44+5:302019-05-20T10:54:19+5:30

अमिताभ यांनी एक ६२ वर्षांपूर्वीचा फोटो पाहून, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

amitabh bachchan share 62 years old college picture | कौन है छोटा पतला डॉन? ६२ वर्षांपूर्वीच्या या फोटोतील अमिताभ बच्चन यांना ओळखा पाहू?

कौन है छोटा पतला डॉन? ६२ वर्षांपूर्वीच्या या फोटोतील अमिताभ बच्चन यांना ओळखा पाहू?

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या अमिताभ रूमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटात बिझी आहेत.

चित्रपटांत बिझी राहणारे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही कमालीचे अ‍ॅक्टिव्ह असतात. अनेकदा चाहत्यांनी शेअर केलेले फोटो पाहून अमिताभ त्या फोटोशी जुळलेले किस्सेही शेअर करताना दिसतात. आता अमिताभ यांनी पुन्हा एकदा एक असाच फोटो पाहून, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 
अमिताभ यांच्या एका चाहतीने हा फोटो शेअर केला. ‘हा अलीपूर, कोलकाताचा फोटो आहे. या फोटोबद्दल काय सांगाल,’ असे या चाहतीने हा फोटो पोस्ट करत लिहिले. अमिताभ यांची नजर या फोटोवर गेली आणि त्यांनी चाहतीची  चूक लगेच तिच्या लक्षात आणून दिली. 




नाही,हा अलीपूर, कोलकात्याचा फोटो नाही. १९५७, शेरवूड कॉलेज, नैनीताल. सुट्टीचे दिवस. मैदानावर आराम करताना आणि खेळतानाचा हा फोटो आहे. आम्ही सगळे फुटबॉल खेळत होतो, असे अमिताभ यांनी सांगितले.



केवळ इतकेच नाही तर हा फोटो पाहून अमिताभ स्वत:च स्वत:ची मजा घेताना दिसले. ‘लोग कहने लगे, पिक्चर छाप दी. बोलो कौन है कौन? नाडा जिसका दिखे, वही है छोटा पतला डॉन,’ असे त्यांनी लिहिले. सोबत लॉफिंग इमोटिकॉनही टाकलेत.
या फोटोत अमिताभ कुठे आहेत, हे अद्यापही तुम्ही ओळखू शकला नसाल तर चला, आम्ही तुम्हाला सांगतो. उजव्या बाजूला तिसºया क्रमांकावर अमिताभ उभे आहेत. या ‘छोटा पतला डॉन’ला ओळखणे कठीण आहे.


सध्या अमिताभ रूमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटात बिझी आहेत. अलीकडे या चित्रपटाचे फर्स्ट लूक समोर आले होते. इमरान हाश्मी यात मुख्य भूमिकेत आहेत. हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे.

Web Title: amitabh bachchan share 62 years old college picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.