Amitabh Bachchan hurt on sets of Thugs of Hindustan ... | ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत..कसा घडला अपघात वाचा सविस्तर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याच संदर्भातली एक बातमी आम्हाला कळली आहे ती म्हणजेच ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना अपघात झाला आहे. बिग बींचा पाय फ्रैक्चर झाला आहे. यामुळे त्यांना पाठीचे दुखणे सुरु झाले आहे. ऐवढे होऊन सुद्धा अमिताभ बच्चन हे शूटिंगसाठी सेटवर जातायेत. आपल्यामुळे चित्रपटाच्या बिझी शेड्यूलमध्ये कोणता बदल होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.चित्रपटाचा एक सीन शूट करताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर अमिताभ या वयातही आपल्या कामाला घेऊन त्यांची कमिटमेंट दिसून आली आहे. त्यांना त्रास होत असतानाही ते रोज येऊन आपले शूट पूर्ण करतायेत.  या चित्रपटात त्यांच्यासोबत आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सेना शेफ यांच्या ही मुख्य भूमिका आहेत.      

ALSO READ : Read details : असा साजरा होणार अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस!

सध्या अमिताभ केबीसीला घेऊन चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केसीबीच्या आठवणींना उजाळा देणारा एक ब्लॉग लिहिला होता.त्यात त्यांनी लिहिले होते की, केसीबीचा 17 वर्षांच्या प्रवास माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. बिग बी 102 नॉट आऊट या चित्रपटात सुद्धा दिसणार आहेत. यात ते 102 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणार आहेत. यात त्यांचा 75 वर्षांचा मुलगा असणार आहे. बाप-मुलाच्या भूमिकेत यात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर दिसणार आहेत.102 नॉट आऊट हा चित्रपट एक गुजराती नाटकावर आधारित आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन सौम्या जोशीने केले आहे. 
Web Title: Amitabh Bachchan hurt on sets of Thugs of Hindustan ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.