Amitabh Bachchan Gets Trolled By Fans For Bursting Crackers During Diwali | या फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी धरले धारेवर
या फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी धरले धारेवर

ठळक मुद्देअमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबियांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे त्यांना सोशल मीडियावर नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले आहे.अमिताभ बच्चन यांनी फटाने फोडून दिवाळी साजरी केली असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील महानायक असून त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांचा ठग्स ऑफ हिंदुस्तान नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच झोडपले असले तरी प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२.२५ कोटी इतका गल्ला जमवला असून या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर अॅडव्हान्स बुकिंग झाले असल्याने हा चित्रपट पुढील काही दिवसांत देखील बॉक्स ऑफिसवर असाच गल्ला जमवेल असे म्हटले जात आहे.

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अमिताभ बच्चन सध्या चांगलेच खूश आहेत. पण अमिताभ बच्चन यांना नुकतेच सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेले आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच त्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबियांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे त्यांना सोशल मीडियावर नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोत त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय यांना पाहायला मिळत आहे. पण या फोटोत त्या दोघांच्या देखील हातात फुलबाजा दिसत असल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. दिवाळीच फटाक्यांमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश बॉलिवूडमधील अनेक कलाकार देत असतात. पण अमिताभ बच्चन यांनी फटाने फोडून दिवाळी साजरी केली असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. तुमच्यासारख्या सेलिब्रेटींनीच फटाके फोडून दिवाळी साजरी केली तर सामान्यांनी काय आदर्श घ्यावा असा सवाल नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. अमिताभ बच्चन यांनी यावर काहीही उत्तर अद्याप दिले नसले तरी ते काय उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.  


Web Title: Amitabh Bachchan Gets Trolled By Fans For Bursting Crackers During Diwali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.