कार्तिक आर्यनला अमिताभ बच्चन यांनी दिली कौतुकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:17 PM2019-04-22T19:17:35+5:302019-04-22T19:17:57+5:30

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Amitabh Bachchan gave credit to Kartik Aryan | कार्तिक आर्यनला अमिताभ बच्चन यांनी दिली कौतुकाची थाप

कार्तिक आर्यनला अमिताभ बच्चन यांनी दिली कौतुकाची थाप

googlenewsNext

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर या चित्रपटातील कृति व कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण करत देशभरात जवळपास ९५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात बॉक्स ऑफिसवर ११५ कोटींचा बिझनेस केला आहे. लुका छुपीच्या यशामुळे कार्तिक खूपच खूश आहे. मात्र सध्या तो सातवे आसमानवर आहे. कारण बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गोष्टींची दखल घेत त्याची प्रशंसा केली आहे.

कार्तिक आर्यनने त्याला अमिताभ बच्चन यांनी स्पेशल कॉम्प्लिमेंट दिली.

कार्तिकने सांगितले की, लुका छुपी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षकांचे खूप प्रेमही मिळाले आहे. माझ्या अपेक्षापेक्षा गुड्डू या भूमिकेला जास्त प्रेम मिळाले. आणखीन एका मिळालेल्या कौतूकाच्या थापमुळे माझ्यासाठी ही भूमिका आणखीन स्पेशल ठरली आहे. बच्चन सरांनी मला केलेला मॅसेज माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. ते म्हणाले की, त्यांनी माझा चित्रपट खूप एन्जॉय केला आणि त्यांना माझे कामदेखील आवडले. जेव्हा मला हा मेसेज मिळाला तेव्हा मी सातवे आसमानवर होतो. 

कार्तिक आर्यनचा हा पहिला चित्रपट नाही ज्याने चित्रपटगृहात पन्नास दिवस पूर्ण केले. हा त्याचा चौथा सिनेमा आहे. 'लुका छुपी'च्या आधी 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा २', 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटांनीदेखील चित्रपटगृहात पन्नास दिवस पूर्ण केले होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.

Web Title: Amitabh Bachchan gave credit to Kartik Aryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.