Amitabh Bachchan to celebrate his birthday | या ठिकाणी साजरा करणार अमिताभ बच्चन आपला वाढदिवस

अमिताभ बच्चन आज वयाची ७५ वर्ष पूर्ण करणार आहेत. सोमवारी बिग बी अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची लाडकी नात आराध्या बच्चनबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसले. सेलिब्रेटी फोटोग्राफर मानव मंगलानीने बच्चन फॅमिलीचे एअरपोर्टवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. संपूर्ण फॅमिलीला एकत्र पाहून एकच अंदाज लावू शकतो की या वेळेस बिग बींचा वाढदिवस त्यांची फॅमिली मिळून परदेशात साजरा करणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवला गेले आहेत. तिथे ते बिग बींचा वाढदिवस  साजरा करणार आहेत. अमिताभ यांना काही दिवसांपूर्वी आपल्या ट्वीटर आकाऊंटवर म्हटले होते की ते ह्यावेळेस दिवाळी साजरी करणार नाही त्यामागचे कारण त्यांनी काही सांगितले नव्हते. या वर्षाच्या सुरुवातीस ऐश्वर्या रायचे  वडील कृष्णराज राय यांचे निधन झाले  होते. त्यामुळे कादाचित बच्चन कुटुंबीय यावेळीची दिवाळी साजरी करणार नसतील. ह्याशिवाय अमिताभ यांनी ऑगस्टमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये असे लिहिले होते की ते त्यांचा वाढदिवस ही साजरा करू इच्छित नाही, त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केला जाणारा गाजावाजा अजिबात आवडत नाही. पण वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना अमिताभ बच्चन यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून फॅमिलीसोबत क्लॉलिटी स्पेंट करण्याचा निर्णय घेतला. 

ALSO READ : Birthday Special : अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घ्या काही माहित नसलेल्या गोष्टी...!

सध्या अमिताभ छोट्या पड्यावरील 'कौन बनेगा करोडपती' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तसेच ते  आमीरखान बरोबर 'ठ्ग्स ऑफ हिंदुस्तान" शूटिंग ही करतायेत. काही दिवसांपूर्वी  बिग बींचा ठग्स ऑफ हिंदुस्तानमधला लुक लीक झाला होता. सोशल मीडियावर सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटाची कथा फारच इंट्रेस्टिंग आहे. हा चित्रपट हॉलिवूडचा पायरेट्स ऑफ केरिबियन शी मिळता जुळता आहे. चित्रपटात चार चोर आहेत आमीर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ यांची गोष्ट आहे. यात बिग बी आमीर खानच्या वडिलांची भूमिका साकारणार करणार आहेत. पहिल्यांदाच दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Amitabh Bachchan to celebrate his birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.