Amitabh Bachchan came to the room while Gulshan Grover and Katrina Kaif were romancing! | गुलशन ग्रोवर अन् कॅटरिना कैफचा रोमान्स सुरू असतानाच रूममध्ये आले होते अमिताभ बच्चन!

बॉलिवूडचा बॅड मॅन अशी ओळख मिळालेले अभिनेते गुलशन ग्रोवर यांना नायकापेक्षा खलनायकाची भूमिका साकारायला अधिक आवडते. याच कारणामुळे त्यांनी आतापर्यंतच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक खतरनाक खलनायक साकारले आहेत. खलनायक साकारताना गुलशन ज्या पद्धतीने ती भूमिका स्वत:मध्ये भिनवून घेतात, त्यावरून बघणाºयांना त्यांच्याप्रती संताप तर होतोच शिवाय सगळं काही वास्तव चित्रण केले जात असल्याचा भासही झाल्याशिवाय राहत नाही. परंतु गुलशन ग्रोवर यांच्या रिअल लाइफचा विचार केल्यास ते खूपच साधेभोळे आणि लाजाळू प्रवृत्तीचे आहेत. आज आम्ही त्यांच्या कारकिर्दीतला असाच एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. 

‘बूम’ या चित्रपटादरम्यानचा हा किस्सा आहे. या चित्रपटातून बॉलिवूडची आघाडीची नायिका कॅटरिना कैफ ही तिच्या करिअरला सुरुवात करणार होती. त्यामुळे तिला कुठल्याच प्रकारची चूक करायची नव्हती. चित्रपटात तिला बॅडमॅन गुलशन ग्रोवर यांच्यासोबत काही हॉट सीन्स द्यायचे होते. कॅट त्यासाठी पूर्णपणे तयार होती, परंतु बॅडमॅन गुलशन ग्रोवरची मात्र चांगलीच फजिती झाल्याचे दिसून येत होते. कारण बोल्ड कॅटसोबत सीन्स देताना गुलशन खूपच नर्व्हस असल्याचे दिसून येत होते. एका सीनमध्ये तर गुलशन यांना कॅटला किस करायचा होता, परंतु ते खूपच नर्व्हस दिसत होते. या सीनसाठी त्यांनी बºयाचदा प्रयत्न केला, परंतु कॅटसोबत तो सीन करणे त्यांना शक्य होत नव्हते. दिग्दर्शकांनी बरेचसे रिटेक घेतले परंतु, दिग्दर्शकांना अपेक्षित असलेला सीन गुलशन ग्रोवर देऊ शकत नव्हते. वास्तविक गुलशन यांनी याअगोदर बºयाचशा चित्रपटांमध्ये रेप सीन्स केले होते, परंतु कॅटसोबत त्यांना किस सीन देणे अवघड झाले होते. अखेर दिग्दर्शकांनीच त्यांना एका रूममध्ये पाठविले अन् या सीनची प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला. दिग्दर्शकांच्या सल्ल्यानुसार गुलशन रूममध्ये गेले; परंतु तरीदेखील ते नर्व्हसच होते. 

कॅट आणि गुलशन दिग्दर्शकांना अपेक्षित असलेल्या सीन्सची प्रॅक्टिस करीत होते. अशात अचानकच महानायक अमिताभ बच्चन रूममध्ये आले. मग काय, कॅट आणि गुलशन यांची चांगलीच पंचाईत झाली. शिवाय अमिताभही या दोघांना अशा अवस्थेत बघून दंग राहिले. अखेर दिग्दर्शकांनीच या सर्व प्रकाराचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर उलगडा केला. जेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनीही गुलशन यांना त्या सीन्ससाठी चीअरअप केले. 
Web Title: Amitabh Bachchan came to the room while Gulshan Grover and Katrina Kaif were romancing!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.