Amitabh and Rekha's love for this incident caused an outcome! What is that incident, you know? | या एका घटनेमुळे तुटलं अमिताभ आणि रेखा यांचं प्रेमाचं नातं!कोणती आहे ती घटना,जाणून घ्या ?

हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरील सगळ्यात लोकप्रिय जोडी म्हणून बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांना एकत्र पाहणं, त्यांच्यातील केमिस्ट्री याची जादू आजही रसिकांवर कायम आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं या जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच आजही ते दोघं पुन्हा एकत्र काम करतील आणि मनोरंजन करतील अशी भाबडी आस रसिकांना आहे. मध्यंतरी अमिताभ आणि रेखा एका सिनेमात एकत्र झळकणार अशा चर्चा होत्या. मात्र त्या केवळ चर्चाच बनून राहिल्या. मात्र आजही अमिताभ आणि रेखा यांचा सिलसिला कायम असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात कानावर पडतात. रुपेरी पडद्यावर नायक-नायिका साकारणारे अमिताभ-रेखा रिअल लाइफमध्येही त्या काळात खूप जवळ आले होते. एकामागून एक हिट सिनेमांमध्ये दोघांची जोडी झळकत होती. सिनेमाच्या यशासह दोघांमधलं नातं आणि लव्हस्टोरीसुद्धा बहरु लागली. 'सुहाग', 'मिस्टर नटवरलाल', 'गंगा की सौंगध', 'नमक हराम', 'खून पसीना', 'सिलसिला' अशा एकाहून एक सुपरहिट सिनेमात ही जोडी झळकली. प्रत्येक सिनेमाच्या यशानंतर या दोघांमधलं प्रेमाचं नातं आणखी बहरत गेल्याचं त्यावेळी बोललं गेलं.

Also Read:अमिताभच नाही तर या अभिनेत्यांसोबतही रेखा यांचे जुळले सूत,तरीही सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच!

'सावन भादो' सिनेमाच्या वेळी काहीशा जाडजूड दिसणा-या रेखा यांनी अमिताभसाठी स्वतःला बदलून घेतल्याच्याही चर्चा रंगल्या.अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रेखा बोल्ड दिसू लागल्या. स्वतःमध्ये त्यांनी खूप बदल घडवून आणला. त्यामुळेच की काय अमिताभही स्वतःला रेखा यांच्यापासून दूर ठेवू शकले नाहीत.त्याच काळात सिलसिला सिनेमाही आला.अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवलेला हा सिनेमा म्हणजे या तिघांची रिअल लाइफ स्टोरी आहे असंच बोललं जातं होतं. मात्र एक सिनेमा असा होता की ज्या सिनेमामुळे अमिताभ आणि रेखा यांच्या नात्यात दुरावा आला.हा सिनेमा बिग बी अमिताभ बच्चन आयुष्यात कधीच विसरणार नाहीत.शिवाय रसिकही हा सिनेमा विसरु शकत नाहीत. 'कुली' सिनेमातील एका फाइट सीनमध्ये अमिताभ बच्चन जखमी झाले. त्यांना त्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जीवन-मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अमिताभ यांच्यासाठी सारा देश प्रार्थना करत होता.या प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे अमिताभ त्यावेळी मृत्यूच्या दाढेतून परतले. त्यांच्यासाठी हा जणू दुसरा जन्म होता. मात्र या दुर्घटनेनंतर अमिताभ आणि रेखा यांच्यातलं प्रेमाचं नातं संपलं. या काळात असं काही तरी घडलं की अमिताभ आणि रेखा यांच्यात कायमचा दुरावा आला.एकमेंकांवर प्रेम करणारे दोघेही दुरावले ते आजतागायत. मात्र त्यावेळी नेमकं काय घडलं हे अमिताभ, रेखा आणि त्यांच्या कुटुंबीयांशिवाय कुणालाच माहित नाही. 

Web Title: Amitabh and Rekha's love for this incident caused an outcome! What is that incident, you know?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.