Amit Sahebi's entry to Salman Khan starrer 'Race 3'? | सलमान खान स्टारर 'रेस 3'मध्ये होणार का अमित साधची एंट्री ?

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस सध्या 'रेस 3'च्या शूटिंग करून मुकतेच मुंबईत परतले आहेत. लेह-लद्दाखमध्ये या चित्रपटाचे शूट करतानाच्या फोटोमध्ये सलमानसोबत अमित साध दिसला आहे. या फोटोला बघून अमित 'रेस3'चा भाग असल्याचा अंदाज लावण्यात येतो आहे. सोनमर्ग या निसर्गरम्यस्थळी जॅक आणि भाईजानने एक रोमॅण्टिक गीत शूट केले आहे. 

त्याचे झाले असे की अमितने ट्विटर अकाऊंटवर  फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अमितने लिहिले आहे की, ''बेस्ट व्यक्तिसोबत माझ्या आयुष्यातील बेस्ट राईड. तुझ्यासोबत (सलमान खान) राईड करण्याची इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.'' सुल्तानमध्ये सलमान खानसोबत अमितने काम केले आहे. आता फॅन्सना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की रेस 3मध्ये सलमानसोबत पुन्हा एकदा अमित दिसणार आहे का ते.  

सलमानसोबत रेस 3 मध्ये जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल आणि अनिल कपूर दिसणार आहेत. ‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तोरानी द्वारा निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविले जात आहे.   याअगोदरच्या दोन भागांमध्ये सैफ अली खान आपल्या अ‍ॅक्शन अंदाजात बघावयास मिळाला. मात्र तिसºया भागात सर्वच स्टारकास्ट बदलली गेल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे. 
याआधी अमित आपल्याला  'ब्रीद' या वेबसीरिजमध्ये दिसला होता. या शोमध्ये अमितच्या काम प्रेक्षकांना आवडले होते. अक्षय कुमारच्या 'गोल्ड'मध्ये सुद्धा अमित दिसणार आहे. याआधी अमितने ‘सरकार-३’मध्ये त्यांने अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारली होती. 

 
Web Title: Amit Sahebi's entry to Salman Khan starrer 'Race 3'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.