Amisha Patel had told the actor this time after the menstrual cycle. | अमिषा पटेलने मासिक पाळीवरून ‘या’ अभिनेत्याला सुनावले होते खडेबोल !

अभिनेत्री अमिषा पटेल हिने एकेकाळी टीव्ही अभिनेता कुशाल टंडन याच्यावर असा काही हल्लाबोल केला होता की, सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. ट्विटरवर अमिषा आणि कुशालमध्ये चांगलाच वाद झाला होता. त्याचे झाले असे की, कुशालने अमिषाला राष्टÑगीताचा आदर करण्यावरून सुनावले होते. त्यावर अमिषाने कुशालला खडेबोल सुनाविताना ‘मुलींच्या खासगी अडचणी समजायला शिक’ अशा शब्दात खडसावले होते. यावरून दोघांमध्ये जवळपास पाच दिवस जबरदस्त वादविवाद बघावयास मिळाला होता. 

कुशालने चित्रपटगृहात चित्रपट बघतानाची एक घटना सांगताना ट्विट केले होते की, ‘मुंबईमधील जुहू परिसरातील एका चित्रपटगृहात चित्रपट बघण्यासाठी गेलो असता राष्ट्रगीत सुरू होताच संपूर्ण प्रेक्षक उभे राहिले होते; परंतु एक मुलगी बसून होती. विशेष म्हणजे ही मुलगी मोबाइलमध्ये व्यस्त होती. तिने उभे राहण्याची तसदी घेतली नाही. आपल्या जागेवर उभे राहणे तर सोडा, फोनकडे बघून हसत होती. त्यानंतर त्याने लिहिले की, ‘मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मी बघितले की, ती मुलगी दुसरी-तिसरी कोणीही नसून अमिषा पटेल होती. कुशालच्या या ट्विटनंतर अमिषा त्यांच्यावर चांगलीच संतापली. तिने एकापाठोपाठ एक ट्विट करीत सोशल मीडियावरच कुशालशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिने ही बाब मान्य केली की, राष्ट्रगीत सुरू असताना खरोखरच मी उभी राहिली नव्हती; मात्र यामागे तिने जे कारण सांगितले त्याचा कोणी विचारही केला नव्हता. अमिषाने सांगितले की, त्यावेळी मला मासिक पाळी आल्याने मी उभी राहू शकली नाही. त्यानंतर अमिषाने कुशालच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. तिने अनेक खासगी गोष्टींचा उल्लेख करताना कुशालला सुनावले. 

अमिषाने स्पष्ट शब्दात सांगितले होते की, ‘मला असे वाटते की, कुशालच्या घरात आई-बहिणी नाहीत, त्यामुळेच त्याला परिस्थितीची जाणीव झाली नाही. ती एवढ्यावरच शांत बसली नाही. तर ‘जर मी त्याठिकाणी उभी राहिली असती अन् रक्तस्त्राव झाला असता तर त्यास जबाबदार कोण?’ असा कुशालला प्रश्नही विचारला. दोघांचा हा वाद खूपच टोकाला गेला होता.  
Web Title: Amisha Patel had told the actor this time after the menstrual cycle.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.