Amir's new look out! | आमीरचा न्यू लूक आऊट!

 बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमीर खान हा सध्या ‘दंगल’च्या शूटींगमध्ये व्यस्त असला तरीही त्याचा आगामी एका चित्रपटातील फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. या लूकमध्ये तो एका वेगळ्याच वेशात दिसत आहे.

अद्वैत चंदन यांच्या दिग्दर्शनाखालील डेब्यू चित्रपटातील हा न्यू लूक आहे. तो एका सुपरस्टाराच्या भूमिकेत असणार आहे. फार महत्त्वाच्या रोलमध्ये तो दिसेल. त्याने आत्तापर्यंत १५ दिवस चित्रपटासाठी शूटिंग केले आहे.

या फोटोत त्याने व्ही नेक टीशर्ट, मल्टीकलर आणि ब्राऊन ब्रॉड बेल्ट घातलेला दिसतोय. तसेच तो फ्रेंच कट दाढीत दिसत असून चौकोनी आकाराच्या चष्यात तो दिसत आहे.

amir khan
Web Title: Amir's new look out!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.