प्रिया प्रकाशच्या अदांनी अल्लू अर्जुनही ‘खल्लास’! पाहा व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:03 PM2019-01-24T16:03:40+5:302019-01-24T16:11:26+5:30

आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले.

Allu Arjun Copy The Bullet-Kiss Moment Of Priya Prakash |  प्रिया प्रकाशच्या अदांनी अल्लू अर्जुनही ‘खल्लास’! पाहा व्हिडीओ!!

 प्रिया प्रकाशच्या अदांनी अल्लू अर्जुनही ‘खल्लास’! पाहा व्हिडीओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘खल्लास गर्ल’ लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. अर्थात हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे.

आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. पुढे अनेक लोक तिच्या या व्हिडिओची कॉपी करताना दिसले. आता या यादीत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनही सामिल झाला आहे. होय, अल्लू अर्जुनने आपल्या सोशल अकाऊंटवर प्रियासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 




‘ओरू अदार लव’ या मल्याळम चित्रपटाच्या तेलगू डब सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन प्रमुख अतिथी होता. याचदरम्यान अल्लू अर्जुनने प्रियाचा ‘बुलेट किस मुव्हमेंट’ रिपीट केला.





गतवर्षीची इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. तिची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते.  ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती. आपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘खल्लास गर्ल’ लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. अर्थात हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस बजावले आहे.  प्रया प्रकाशचा हा आगामी चित्रपट सुपरस्टार श्रीदेवी आणि त्यांच्या अपघाती मृत्यूवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Allu Arjun Copy The Bullet-Kiss Moment Of Priya Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.