Alibaug owner Will Shah Rukh Khan's problems increase? | ​अलिबागेतील अलिशान व्हिलाचा मालक शाहरूख खानच्या अडचणी वाढणार ?

अलिबागमध्ये अलिशान व्हिला बांधणारा किंगखान शाहरूख खान अडचणीत सापडू शकतो. होय, या अलिशान बंगल्यासाठी कागदपत्रांसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शाहरूख बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो.

इंडिया टुडेने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. वृत्तात म्हटल्याप्रमाणे, या व्हिलासाठी शाहरूखने बनावट कागदपत्रे बनवली होती. दक्षिण मुंबईलगतच्या समुद्र किनाºयाजवळच्या एका कृषी वापराच्या जमिनीवर हा व्हिला उभारण्यात आला आहे. ही जमिनी खरेदी करण्यासाठी एक कंपनी बनवण्यात आली. या कंपनीला शाहरूखने ८.४५ कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.  सुरेन्द्र धावले यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. तक्रारकर्त्यानुसार, शाहरूखने नियम धाब्यावर बसवत, दुरूस्ती करण्याच्या नावावर नव्याने बंगला उभा केला. अलीबागमधील शाहरूखचा हा बंगला ५ एकरावर पसरलेला आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, हा बंगला उभारतांना सागरी किनारपट्टीसाठीच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले.ALSO READ: शाहरूख खान प्रकरण आता अधिवेशनातही गाजणार, आमदार जयंत पाटील यांचा संताप कायम!

गत ३ नोव्हेंबरला शाहरूखने आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. अलीबागच्या बंगल्यात त्याचा वाढदिवस साजरा झाला होता. अलिबागला वाढदिवस साजरा करणाºया शाहरूखला मुंबईत परतताना समुद्र किनाºयावर आमदार जयंत पाटील यांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. कारण शाहरूखच्या बोटीमुळे जयंत पाटील यांना त्याच्या चाहत्यांमधून वाट काढत बराच वेळ ताटकळत बसावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या संतापाचा चांगलाच पारा चढला होता. त्यांनी थेट शाहरूखच्या बोटीत जाऊन त्याला खरी-खोटी सुनावली होती. त्याच्या वाढदिवसासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. वाढदिवस सेलिब्रेट केल्यानंतर शाहरूख सुपर बोटने मुंबईत परतत होता. त्याची बोट गेट वे आॅफ इंडियाजवळील जेट्टीवर पोहोचली. ही बाब जेव्हा त्याच्या चाहत्यांना कळाली तेव्हा हजारोंच्या संख्येने त्यांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. त्यातच शाहरूख बराच वेळ बोटीमध्येच बसून राहिल्याने गर्दी वाढतच गेली. यादरम्यान पोलिसांनी इतर प्रवाशांनाही शाहरूखमुळे रोखून ठेवले. या प्रवाशांमध्ये आमदार जयंत पाटील यांचा समावेश होता. 
Web Title: Alibaug owner Will Shah Rukh Khan's problems increase?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.