'सडक2'साठी आलियाने केलं हे धाडस, वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:17 PM2019-06-11T12:17:47+5:302019-06-11T12:27:09+5:30

अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राजी सिनेमात केलेल्या अभिनयासाठी तिने अनेक अॅवॉर्ड्स आपल्या नावावर केले.

Alia will be seen without make up in movie sadak 2 | 'सडक2'साठी आलियाने केलं हे धाडस, वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

'सडक2'साठी आलियाने केलं हे धाडस, वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

googlenewsNext
ठळक मुद्दे आलियाला सिनेमासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. सडक 2 मधील काही सीन्स शूट केले आहेत

अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राजी सिनेमात केलेल्या अभिनयासाठी तिने अनेक अॅवॉर्ड्स आपल्या नावावर केले. लवकरच आलिया 'ब्रह्मास्त्र' आणि 'सडक2' मध्ये दिसणार आहे. 'सडक2' तिच्यासाठी खास आहे कारण या सिनेमाचे दिग्दर्शक तिचे वडील महेश भट करणार आहेत. 


आजतकच्या रिपोर्टनुसार सडक2 मधील आलियाच्या लुक्स संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे.  यात आलिया मेकअप शिवाय काम करणार आहे. सिनेमाची कथा खूपच मजबूत आहे त्यामुळे आलियाला सिनेमासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे.

सिनेमाच्या पहिल्या शूटिंगच्या शेड्यूलसाठी ती न्यूड मेकअप करुन शूट करणार आहे. सुरुवातीच्या दिवसात ती फक्त 25 मिनिटांत तयार व्हायची. 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगसाठी बनारसला जाण्याच्या आधी तिने सडक 2 मधील काही सीन्स शूट केले आहेत. 


१९९१ मध्ये ‘सडक’ चित्रपट प्रचंड गाजला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले होते. २० वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडले होते. पण आता तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतले आहेत.  

आलियासह यात संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य राय कपूर अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे.  २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Web Title: Alia will be seen without make up in movie sadak 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.