Alia Bhatt took hard work for 'Raji'! If you can not believe the video then see !! | ‘राजी’साठी आलिया भट्टने घेतले बरेच कष्ट ! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ!!

आलिया भट्ट सध्या तिच्या ‘राजी’ या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. भारतासाठी हेरगिरी करणा-या तरूणीची भूमिका आलियाने यात साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि यातील आलियाचा अभिनय पाहून प्रत्येक जण अवाक् झाला. ‘हायवे’नंतर ‘राजी’मध्ये आलिया पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसतेय. पण ही भूमिका सोपी नव्हती. आलियाने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. ‘राजी’चा मेकिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही याची खात्री पटेल. या चित्रपटासाठी आलियाने मोर्स कोडिंग शिकली. मोर्स कोडिंगमध्ये विविध शब्दांसाठी डॉट्सचा वापर होता. हे इलेक्ट्रॉनिक पल्स रेडिओद्वारे पाठवले जातात. आलियाला ‘राजी’ चित्रपटासाठी असे अनेक कोड्स पाठ करावे लागलेत. केवळ इतकेच नाही तर यातील अ‍ॅक्शन सीन्ससाठीही आलियाने विशेष ट्रेनिंग घेतले, डायव्हिंग शिकले. आलियाला जीप चालवता येत नव्हती. पण या चित्रपटासाठी ती जीप चालवायला शिकली. आलियाचे चाहते असाल तर ‘राजी’चा मेकिंग व्हिडिओ तुम्ही एकदा तरी पाहायला हवायं. शिवाय तो कसा वाटला हेही आम्हाला कळवायला हवे.‘राजी’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे.  आलिया यात सहमत नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारते आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. तेथे  राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो.  आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळताहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं.  

ALSO READ : ‘राजी’चा दमदार ट्रेलर ! आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक खास ‘ट्रिट’!!

आलियासोबत विकी कौशल या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. येत्या ११ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार हिने केले आहे. संगीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी हिची मुलगी अशी मेघनाची एक ओळख आहे.‘राजी’चे बहुतांश शूटींग काश्मीरात झाले आहे.
Web Title: Alia Bhatt took hard work for 'Raji'! If you can not believe the video then see !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.