Alia Bhatt spoke about Casting Cow; Say, 'The advantage of the strugglers is the advantage!' | कास्टिंग काऊचबद्दल बोलली आलिया भट्ट; म्हणे,‘स्ट्रगल करणाऱ्यांचा घेतला जातो फायदा!’

‘मी टू’ चळवळीनंतर हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी चित्रपट मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याची जाहीर कबुली देण्यास सुरुवात केली आहे. हार्वी वाइनस्टिनसारखे अनेक शोषण करणारे निर्माते जगभरातील चित्रपटसृष्टीत आहेत. ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार आजही सर्रास सुरू आहे हे आजपर्यंत दबक्या आवाजात पुटपुटणाऱ्या  तोंडातून बाहेर पडले. त्याचे पडसाद बॉलिवूडमध्येही उमटले. रणवीर सिंगपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यावर मतप्रदर्शन केलं. बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री आलिया भट्टनेही दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. इंडस्ट्रीत स्ट्रगल करणाऱ्यांचा फायदा काही लोक घेतात, असं टीका तिनं केली.

कास्टिंग काऊचविषयी बोलताना ती पुढे म्हणते, ‘माझ्या मते कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर जेव्हाही बोललं जातं, तेव्हा आपोआपच वातावरण नकारात्मक होऊ लागतं. ही इंडस्ट्रीच वाईट आहे, असं लोक समजू लागतात. काम मिळवण्यासाठी अनेकांना वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. स्पर्धा इतकी वाढली आहे की प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इथे खूप मेहनत घ्यावी लागते आणि स्ट्रगल करणाऱ्यांचा अशा वेळी काही जण फायदा घेऊ पाहतात. हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे. कास्टिंग काऊचसारख्या प्रकरणांवर मौन न बाळगण्याचं आवाहन आलियाने केलं. त्याचप्रमाणे पालक आणि पोलिसांकडे याविषयी तक्रार करण्यासही तिने सांगितलं. नवोदित कलाकारांनी या क्षेत्रात येताना या गोष्टींचं भान बाळगणं, सतर्क राहणं गरजेचं असतं, असं मत तिने नोंदवलं. 

‘राजी’ या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याची लावून देतात. पाकिस्तानात राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळत आहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं. मेघनाचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित आहे आलियाच्या नवऱ्याची भूमिका विक्की कौशलने साकारली आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारत-पाक संबंधावर आधारित आहे.
Web Title: Alia Bhatt spoke about Casting Cow; Say, 'The advantage of the strugglers is the advantage!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.