Alia Bhatt signed another big budget movie | आलिया भट्टने साईन केला आणखीन एक बिग बजेट चित्रपट

'राजी' चित्रपट आलियाने साकारलेल्या भूमिकेचे सगळ्यांची कौतुक केले. आपल्या जबरदस्त अभिनयातून आलियाने प्रेक्षकांची वाह वाह मिळवली आहे. आता आलिायाला लाइट हार्टेड चित्रपटात काम करायचे आहे. सध्या आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' आणि वरुण धवनसोबत कलंक चित्रपटाचे शूटिंग करते आहे जो मल्टीस्टारर चित्रपट आहे. या दोन चित्रपटानंतर आलियाने आणखीन एक चित्रपट साईन केला आहे.     

आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की आलिया दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. आलियाने अश्विनी अय्यर तिवारीचा चित्रपट साईन केला आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ''मी लवकरच अश्विनीच्या चित्रपटात दिसणार आहे. तो खूप कमालीची दिग्दर्शिका आहे. चित्रपटाचे निर्माते यासंदर्भातील घोषणा लवकरच करतील.' अश्विनी माझ्या एक चांगली कथा घेऊन आली होती. मी तिच्यासोबत काम करायला खूपच उत्साहि आहे. मला आता एक लाइट हार्टेड चित्रपट करायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट स्त्री केंद्रीत असणार आहे. हा चित्रपट संवेदनशील असणार आहे. चित्रपटाची कथा पंजाबच्या धरतीवर आधारित आहे. चित्रपट कथा एका मुलीची स्वप्न आणि तिच्या आई-वडिलांशी तिच्याशी असलेल्या नातेसंबंधा भवती फिरणारी आहे. अश्विनीचा आगामी चित्रपटात म्युझिकल ड्रामा असणार आहे. 

आलिया भट्टच्या नुकताच रिलीज झालेल्या राजी चित्रपटाने पाच दिवसात बॉक्स ऑफिसवर 45.34 कोटींचा गल्ला जमावला आहे. आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांच्या मुख्य भूमिका आहेत. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारत-पाक संबंधावर आधारित आहे. या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती एक भारतीय तरूणी असून देखील पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करते आणि पाकिस्तानात राहून ती भारतीय आर्मीला गोपनीय माहिती पुरवते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. 

ALSO RAED :  बॉलिूवडच्या ‘या’ अभिनेत्रीची आलिया भट्ट हिला करायचीय ‘हेरगिरी’! पण का, वाचा!

 
Web Title: Alia Bhatt signed another big budget movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.