आलिया म्हणते, 'टिप-टिप बरसा पानी', पिवळ्या साडीतील तिचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 11:00 AM2019-06-27T11:00:29+5:302019-06-27T11:02:57+5:30

आलियाने युट्युब चॅनल लॉन्च केले आहे. युट्युब चॅनल लॉन्च करताच 32 हजाराहूनही अधिक चाहत्यांनी या चॅनलला सब्सक्राईब केले आहे.

Alia Bhatt kicks off new YouTube channel. have you seen her Tip Tip Barsa Paani dance? | आलिया म्हणते, 'टिप-टिप बरसा पानी', पिवळ्या साडीतील तिचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?

आलिया म्हणते, 'टिप-टिप बरसा पानी', पिवळ्या साडीतील तिचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?

googlenewsNext

आलिया भट सध्या ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगमधूनच थोडा वेळ मिळाला तर आलिया सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असते. तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक आतुर असतात. नुकेच आलियाने एक खास व्हीडीओ शेअर केला आहे. आलिया आणखीन व्हि़डीओ समोर आला आहे. पिवळ्या रंगाच्या साडीतला हा आलियाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. टिप-टिप बरसा पानी गाण्यावर आलिया डांस करताना पाहायला मिळते.

 

एकीकडे आलिया दिलखुलास डान्स करते तर दुसरीकडे तिचे मित्र तिच्या अंगावर पाणी उडवताना दिसतायेत. आलियाने युट्युब चॅनल लॉन्च केले आहे. युट्युब चॅनल लॉन्च करताच  32 हजाराहूनही अधिक चाहत्यांनी या चॅनलला सब्सक्राईब केले आहे.  चॅनलच्या माध्यमातून आलिया आपल्या चाहत्यांसह आपल्या आगामी सिनेमा, तिचे रूटीन तसेच आयुष्याशी निगडीत सगळे अपडेट ती चाहत्यांना देणार आहे. खुद्द आलियानेच तिच्या या चॅनलविषयी माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.



तुर्तास आलियाचा हा व्हिडीओ रसिकांची तुफान पसंती मिळवत आहे. ब्रम्हास सिनेमात आलिया रणबीर कपूरसह रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.अयान मुखर्जीने सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 20 डिसेंबर 2019 सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि साउथचे सुपरस्टार नागार्जुन झळकणार आहे. तसेच  पहिल्यांदाच आलियाने सलमान खानसह काम केले आहे. इंशाअल्लाह सिनेमात ती सलमान आणि आलिया ही जोडी पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Alia Bhatt kicks off new YouTube channel. have you seen her Tip Tip Barsa Paani dance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.