OMG: रणबीर कपूरपेक्षा आलियाला वाटतोय 'हा' अभिनेता जास्त हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:47 PM2019-04-29T12:47:00+5:302019-04-29T12:50:14+5:30

'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया सिनेसृष्टित पदार्पण करतायेत. त्याच्यासोबत आणखी एक नवा चेहरा याच सिनेमातून डेब्यू करणार आहे.

Alia bhatt considers Aditya seal more handsome than Ranbir kapoor | OMG: रणबीर कपूरपेक्षा आलियाला वाटतोय 'हा' अभिनेता जास्त हँडसम

OMG: रणबीर कपूरपेक्षा आलियाला वाटतोय 'हा' अभिनेता जास्त हँडसम

googlenewsNext
ठळक मुद्देआदित्य सीलने टायगर श्रॉफसोबत ट्रेनिंग घेतली आहे. या फोटोमध्ये आदित्य रणबीर कपूरसोबत फुटबॉल खेळताना दिसतोय

'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया सिनेसृष्टित पदार्पण करतायेत. त्याच्यासोबत आणखी एक नवा चेहरा याच सिनेमातून डेब्यू करणार आहे. त्याचे नाव आहे आदित्य सील. 

आदित्य सीलने टायगर श्रॉफसोबत ट्रेनिंग घेतली आहे. या सिनेमात त्याने अनेक अॅक्शन सीन्स दिले आहेत. मात्र सध्या आदित्य त्याच्या लूक्सला घेऊन चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य सीलने रणबीर कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आदित्य रणबीर कपूरसोबत फुटबॉल खेळताना दिसतोय. एका यूजरने त्या फोटोवर रणबीरपेक्षा आदित्य जास्त गुडलूकिंग असल्याची कमेंट केली आहे. विशेष म्हणजे या कमेंटला आलिया भट्टने देखील लाईक करत सहमती दर्शवली आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, आलिया भट बॉयफ्रेंड रणबीर कपूरपेक्षा आदित्य सीलला जास्त गुडलूकिंग मानते. 

आदित्य आणि आलियाची ओळख एका पार्टी दरम्यान झाली होती. आदित्य अनुष्का रंजनचा जवळचा मित्र आहे तर अनुष्का आलियाची बेस्टफ्रेंड आहे. एका मुलाखती दरम्यान आदित्यने सांगितले होते की, त्याची क्रिकेटर होण्याची फार इच्छा होती मात्र त्याला एक गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. 

स्टुडंट ऑफ द इयरच्या सिक्वेलमध्ये आदित्य निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशननंतर आदित्यला हा रोल मिळाला आहे. याआधी त्याने २००७ मध्ये आलेल्या 'सलाम इंडिया', 'नमस्ते लंडन' आणि २०१४ मध्ये आलेल्या 'पुरानी जीन्स' चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Web Title: Alia bhatt considers Aditya seal more handsome than Ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.