विमानतळावरून आलिया भट थेट पोहोचली करण जोहरच्या घरी, दिसली रणबीर कपूरसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:14 PM2019-04-14T17:14:56+5:302019-04-14T17:17:07+5:30

कलंक या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी या चित्रपटाची टीम सोडत नाहीये. या चित्रपटाची टीम विविध शहरांमध्ये आणि रिऍलिटी शो ला हजेरी लावत आहे.

Alia Bhatt catches up with boyfriend Ranbir Kapoor right after she returns from the Delhi promotions of Kalank | विमानतळावरून आलिया भट थेट पोहोचली करण जोहरच्या घरी, दिसली रणबीर कपूरसोबत

विमानतळावरून आलिया भट थेट पोहोचली करण जोहरच्या घरी, दिसली रणबीर कपूरसोबत

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहरच्या घराच्या बाहेर तिला पाहण्यात आले यावेळी तिच्यासोबत रणबीर कपूर आणि ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील होता. यावरून ही मीटिंग ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या संदर्भात असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. 

कलंक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत आहेत. या चित्रपटात आलिया भट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी या चित्रपटाची टीम सोडत नाहीये. या चित्रपटाची टीम विविध शहरांमध्ये आणि रिऍलिटी शो ला हजेरी लावत आहे.

कलंक या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भारतभर फिरून या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या प्रमोशनचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करते. आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच दिल्लीला गेली होती. प्रमोशनवरून परतल्यानंतर आलियाला मुंबई विमानतळावर प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आले. पण विमानतळावरून थेट घरी न जाता आलिया करण जोहरच्या घरी गेली. करण जोहरच्या घराच्या बाहेर तिला पाहण्यात आले यावेळी तिच्यासोबत रणबीर कपूर आणि ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील होता. यावरून ही मीटिंग ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या संदर्भात असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. 

‘कलंक या चित्रपटानंतर आलियाचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबतच रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. कलंकच्या कथेबद्दल फार खुलासा झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट हिंदू- मुस्लिम वादावर आधारित आहे. ८० कोटी रूपये खर्चून बनवलेला हा चित्रपट अगदी शूटींग सुरु झाल्यापासून चर्चेत आहे.

४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. साहजिकचं या चित्रपटाकडून करणला प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. जाणकारांच्या मते, हा चित्रपट आलिया व वरूणच्या करिअरमधील हायेस्ट ओपनिंग ग्रॉसर ठरू शकतो. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: Alia Bhatt catches up with boyfriend Ranbir Kapoor right after she returns from the Delhi promotions of Kalank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.