आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:10 PM2019-02-08T19:10:00+5:302019-02-08T19:10:00+5:30

बॉलिवूडची क्युट गर्ल म्हणजेच आलिया भट व रणवीर सिंगने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.

Alia Bhat is the nickname, after reading it you will smile | आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

googlenewsNext
ठळक मुद्देआलियाचे टोपण नाव आहे आलू

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा'मध्ये अभिनेत्री आलिया भट व अभिनेता रणवीर सिंगने आगामी चित्रपट 'गली बॉय'चे प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी त्या दोघांनी आपल्या चाहत्यांशी गप्पा मारल्या व चित्रपटातील गाण्यावर नृत्य करत धमाल केली. 

'द कपिल शर्मा' या शोमध्ये कपिलने रणवीर आणि आलियाला विचारले की, त्यांनी आपल्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे फोन नंबर काही टोपण नावांनी सेव्ह केले आहेत का? यावर आलिया म्हणाली की, “मला हे माहीत आहे की माझ्या काही मित्रांनी माझे नाव आलू बटाटा, आलू भुजिया म्हणून सेव्ह केले आहेत. कारण माझे टोपण नाव आलू आहे. आणि मी प्रत्यक्ष जीवनात देखील बटाट्यासारखीच आहे. बटाटा जसा कोणत्याही भाजीबरोबर, स्वयंपाकातील कोणत्याही पदार्थासोबत चालतो, तसेच माझे देखील सर्वांसोबत छान जमते.”


रणवीरने सांगितले, 'एकदा मी माझ्या खास मित्राचा फोन घेऊन त्यात माझे नाव गॉड असे सेव्ह केले, जेणेकरून मी त्याला कधीही फोन केला तरी त्याला असे वाटले पाहिजे की देवाने त्याला फोन केला आहे.'


आलिया भटरणवीर सिंगची 'द कपिल शर्मा' शोमधील धमाल पाहण्यासाठी येत्या रविवारी रात्री ९.३० भाग पहा.

Web Title: Alia Bhat is the nickname, after reading it you will smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.