Ali will do 'Golmaal 4'? | आलिया करणार ‘गोलमाल ४’ ?

 अरेच्चा...असं का झालं? गोलमाल सीरिज मध्ये तर करिना आहे ना? मग तिला का काढलं असं तुम्हाला वाटत असेल! वेल, तुम्ही विसरताय की, बेगम करीना कपूर खान ही गरोदर आहे. डिसेंबरमध्ये ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

रिहा कपूर दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातच ती कसेतरी काम करण्यासाठी तयार झाली आहे. वेल, हे तर चांगलेच झाले की, आलिया गोलमाल सीरिजमध्ये आता कॉमेडी करताना दिसणार आहे.

रोहित शेट्टीने आलियाची मुख्य भूमिकेत निवड केली आहे. तिच्याशी बोलणंही झाले असून ती तयार झाली आहे. ‘गोलमाल ४’ च्या निमित्ताने दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे पाच वर्षांनंतर एकत्र येतील. ‘गोलमाल’ ला दहा वर्षे पूर्ण झाल्याने ‘गोलमाल ४’ ची घोषणा करण्यात आली आहे. तर मग व्हा खुप खुप हसायला तयार.’ 
Web Title: Ali will do 'Golmaal 4'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.