Akshay Kumar's upcoming film, starring Amitabh Bachchan | शूटिंगच्या आधी बीचवर मस्ती करतेय अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटातील ही अभिनेत्री

अक्षय कुमारच्या केसरी या आगामी चित्रपटातील अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या खूप खुश आहे.यामागचे कारण ही तसेच आहे. परिणीतीची मनातील इच्छा पूर्ण झाली आहे आणि सध्या ती आपला आनंद साजरा करण्यासाठी मालद्वीपला गेली आहे. मालव्दीपच्या बीचवरचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. परिणीतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे.फोटोला तिने कॅप्शनदेखील दिले आहे. ''जेव्हा पण डाइव्ह करते मला आनंद मिळतो.''  

एका फोटोत परिणीती डाइव्हिंग करुन बाहेर निघताना दिसते आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती बीचवर मस्ती करताना दिसते आहे. केसरी चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी परिणीती व्हेकेशन एन्जॉय करायला मालव्दीपला पोहोचली आहे. 


'केसरी'मधून पहिल्यांदा परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. अनुराग सिंह हा चित्रपट दिग्दर्शित करेल. ‘केसरी’चे कथानक १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले असल्याचे कळते. ही लढाई ‘बॅटल आॅफ सारागढी’ नावाने ओळखले जाते. .  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.


काही दिवसांपूर्वी परिणीतीने संदीप और पिंकी फरारची शूटिंग पूर्ण केली आहे. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. या चित्रपटातून पुन्हा एकदा परिणीती आणि अर्जुन कपूर स्क्रिन शेअर करणार आहे.  दिबाकर बॅनर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.  अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 
Web Title: Akshay Kumar's upcoming film, starring Amitabh Bachchan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.