#BottleCapChallenge : ऐकले का? तो अक्षय कुमार नाही तर रितेश देशमुख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 12:37 PM2019-07-04T12:37:51+5:302019-07-04T12:39:12+5:30

हॉलिवूड स्टार जेसन स्टेथमने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची सुरुवात केली आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने लगेच हे ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारले. पण अभिनेता रितेश देशमुखचे मानाल तर या व्हिडीओतील ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करणारी व्यक्ती अक्षय नाहीच.

akshay kumars bottle cap challenge video riteish deshmukh claims to complete the challenge wearing his mask | #BottleCapChallenge : ऐकले का? तो अक्षय कुमार नाही तर रितेश देशमुख!!

#BottleCapChallenge : ऐकले का? तो अक्षय कुमार नाही तर रितेश देशमुख!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बॉटल कॅप चॅलेंज’ हॉलिवूड अभिनेत्यांपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत सर्वजण स्वीकारत आहेत.

हॉलिवूड स्टार जेसन स्टेथमने #BottleCapChallengeची सुरुवात केली आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने लगेच हे ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारले. अक्षयच्या या ‘बॉटल कॅप चॅलेंज’चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत अक्की ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करताना दिसतो. ‘बॉटल कॅप चॅलेंज’मध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर पायाने किक मारून त्या बॉटलचे झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. हे करताना बॉटल नाही तर फक्त बॉटलचे झाकण खाली पडले पाहिजे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार  हे चॅलेंज पूर्ण करताना दिसतोय . पण अभिनेता रितेश देशमुखचे मानाल तर या व्हिडीओतील ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करणारी व्यक्ती अक्षय नाहीच. आता अक्षय नाही तर मग आहे तरी कोण? तर अक्षयचा मास्क घाललेला रितेश देशमुख.




होय,रितेशने अक्षय कुमारचा  हा व्हिडीओ रितेशने मजेशीर अंदाजात शेअर केला आहे. यासोबतचे कॅप्शन चांगलेच मजेशीर आहे. ‘मी यापेक्षा उत्तम करू शकत नाही. अक्षय कुमारचा मास्क लावून मी बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. पण सावध राहा, कारण हा व्हिडीओ त्याचा असल्याचा दावा अक्षय कुमार करु शकतो.  एक चांगला मित्र म्हणून मी अक्षयला असे करण्यापासून रोखू शकत नाही,’ असे रितेशने लिहिले आहे. रितेश इथेच थांबला नाही तर ‘माझा पुढचा व्हिडीओ टायगर श्रॉफच्या मास्कमध्ये असेल,’ असे पुढे त्याने लिहिले.
रितेशचा हा खट्याळपणा तुमच्या लक्षात आलाच असेल. आता तर गमतीगमतीत टायगर श्रॉफला त्याने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ दिले आहे. टायगर हे चॅलेंज स्वीकारतो की नाही, हे माहित नाही. पण अद्याप अक्कीने रितेशला उत्तर दिलेले नाही. तो काय उत्तर देतो ते बघूच.

‘बॉटल कॅप चॅलेंज’ हॉलिवूड अभिनेत्यांपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत सर्वजण स्वीकारत आहेत आणि या चॅलेंजचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.



 

Web Title: akshay kumars bottle cap challenge video riteish deshmukh claims to complete the challenge wearing his mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.