Housefull -4 मध्ये काहीशा अशा लूकमध्ये दिसणार अक्षय कुमार, सेटवरचा फोटो लीक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:05 PM2018-10-16T12:05:50+5:302018-10-16T12:07:40+5:30

‘हाऊसफुल 4’च्या सेटवरचा अक्षयचा एक फोटो लीक झाला आहे. त्याचा हा अवतार  अभिनेता रणवीर सिंगच्या ‘बाजीराव’ लूकशी बराच मिळताजुळता आहे.

akshay kumars bald historical warrior look for Housefull 4 | Housefull -4 मध्ये काहीशा अशा लूकमध्ये दिसणार अक्षय कुमार, सेटवरचा फोटो लीक!!

Housefull -4 मध्ये काहीशा अशा लूकमध्ये दिसणार अक्षय कुमार, सेटवरचा फोटो लीक!!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ‘हाऊसफुल 4’ या आपल्या आगामी चित्रपटात कमालीच‘ बिझी आहे. याचदरम्यान ‘हाऊसफुल 4’च्या सेटवरचा अक्षयचा एक फोटो लीक झाला आहे. या फोटोत अक्षय कुमार मुंडण केलेल्या अवतारात दिसतोय. त्याचा हा अवतार  अभिनेता रणवीर सिंगच्या ‘बाजीराव’ लूकशी बराच मिळताजुळता आहे. अक्षयचे हे लूक पाहून ‘हाऊसफुल 4’बद्दल प्रेक्षकांचे कुतूहल वाढले आहे. अक्षयची ही भूमिका पूनर्जन्माशी संबंधित असल्याचे कळतेय. तूर्तास सोशल मीडियावर अक्कीचे हे रूप अनेकांना आवडले असून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



चित्रपटानुसार आपले लूक बदण्यात अक्षय कुमार एकदम माहिर आहे.  या चित्रपटात अक्षय डबलरोलमध्ये दिसणार असल्याचे कळतेय़. यापैकी एक रोल वर्तमानातला असेल आणि दुसरा ‘बाहुबली’ काळातील. म्हणजे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे पुनर्जन्माची कथा दाखवली गेली होती, अक्षयची पात्राची कथाही काहीशी अशीच असेल. 
 आधी साजिद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता़ पण साजिदवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लागल्यानंतर त्याला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. नाना पाटेकर यांनाही अशाच आरोपांमुळे हा चित्रपट सोडावा लागला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ‘हाउसफुल- 3’ हा 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
 अक्षयशिवाय या चित्रपटात बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृती खरबंदा, पूजा हेगडे अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे.

 

Web Title: akshay kumars bald historical warrior look for Housefull 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.