Akshay Kumar went to Golden Temple, no one saw ... | ​अक्षय कुमार गोल्डन टेम्पलला गेला, कोणी नाही पाहिला...

अक्षय कुमारने नुकताच त्याच्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत गोल्डन टेम्पलच्या आवारात आपल्याला अक्षय कुमारला पाहायला मिळत आहे. अक्षय शांतपणे मांडी घालून तिथे बसलेला दिसत आहे. या फोटोसोबत त्याने एक पोस्ट देखील लिहिलेली आहे. त्याने या फोटोसोबत म्हटले आहे की, मला नुकतीच गोल्डन टेम्पलला जायची संधी मिळाली. गुरबानी ऐकणे आणि शांत बसून आजूबाजूचे सगळे न्याहाळणे यात एक वेगळाच आनंद मिळतो. सुरील हा एक शब्दच त्यावेळी माझ्या डोक्यात घोळत आहे. 
अक्षय कुमारच्या या फोटोला अनेकांनी लाइक केले आहे तर अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय गोल्डन टेम्पलला गेला तरी कोणालाच कसे कळले नाही याचे आश्चर्य त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. अक्षय कुमार गोल्डन टेम्पलला कधी गेला, कोणासोबत केला हे कोणालाच कसे कळले नाही. अक्षय सारखा अभिनेता मंदिरात जाऊन कोणालाही त्या बाबत कळत नाही हे नवलच असल्याचे त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे. अक्षयने सगळ्यांच्या हातावर तुरी दिली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
अक्षय कुमार सध्या गोल्ड या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. या चित्रपटाद्वारे छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून  अक्षय गोल्डन टेम्पलला गेला होता. 
गोल्ड या चित्रपटात अक्षयचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तो या एका स्पोर्टसमॅनची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात बालबिर सिंग या हॉकीपट्टूची तो भूमिका साकारणार असून बालबिर सिंगच्या टीमने हॉकीत ऑल्मपिक मेडल मिळवले होते.  
अक्षय कुमार गोल्ड या चित्रपटासाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. गोल्ड या चित्रपटाआधी अक्षयचा टॉयलेट एक प्रेम कथा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षतांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील खूपच चांगला व्यवसाय केला होता. आता अक्षय कुमारच्या गोल्ड या चित्रपटाकडून त्याच्या फॅन्सना खूप साऱ्या अपेक्षा आहेत.  

Also Read : ​एली अवरामने वाढवली अक्षय कुमारची डोकेदुखी... अक्षयच्या मदतीला आला मनीष पॉल !
Web Title: Akshay Kumar went to Golden Temple, no one saw ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.