‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार! चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:58 AM2019-06-25T11:58:26+5:302019-06-25T11:59:13+5:30

मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा  रिक्रिएट केले जाणार म्हटल्यावर खरे तर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण सध्या तरी अक्षयचे चाहते फार खूश नाहीत, असेच दिसतेय.

akshay kumar troll ignoring raveena in tip tip barsa paani song recreate | ‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार! चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस!!

‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार! चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पिवळ्या साडीतील रवीनाला कुणीच रिप्लेस करू शकत नाही,’अशी प्रतिक्रियाही अनेक युजरने दिले.

अक्षय कुमार सध्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात कतरीना कैफ अक्षयची हिरोईन असणार आहे. आणखी खास म्हणजे, या सिनेमात अक्षयचे ‘टिप टिप बरसा पानी’ हे आयकॉनिक सॉन्ग रिक्रिएट केले जाणार आहे. ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा  रिक्रिएट केले जाणार म्हटल्यावर खरे तर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण सध्या तरी अक्षयचे चाहते फार खूश नाहीत, असेच दिसतेय. या गाण्यावरून अक्षय सध्या ट्रोल होतोय.




अक्षय कुमाररवीना टंडनला इग्नोर करून स्वत: या गाण्याचे श्रेय घेत असल्याचा चाहत्यांचा आरोप आहे. यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



 

‘अक्की, आमचे तुझ्यावर प्रेम आहे. पण रवीनाला ‘टिप टिप बरसा पानी’चे श्रेय देणे विसरू नकोस. हे गाणे केवळ तुझ्यामुळे हिट झालेले नाही. मी रवीनाचा खूप मोठा फॅन नाही. पण तरीही कतरीना कधीच हे गाणे रिक्रिएट करू शकत नाही,’ असे एका युजरने यावर लिहिले आहे.





 

एका युजरने तर अक्षयला चांगलेच सुनावले आहे. ‘ तू त्या गाण्यात होतास, हे सांगण्यासाठी आभार. पण मला ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे केवळ रवीना, तिची पिवळी साडी आणि पाऊस यासाठी आठवते’असे त्याने लिहिले.



‘सर, तुम्ही त्या गाण्यात होते, हे कुणालाच आठवत नाही,’ असे अन्य एका युजरने खोचकपणे लिहिले. ‘पिवळ्या साडीतील रवीनाला कुणीच रिप्लेस करू शकत नाही,’अशी प्रतिक्रियाही अनेक युजरने दिले.
एकंदर काय तर ‘टिप टिप बरसा पानी’ आणि पिवळ्या साडीतील रवीना टंडन हे समीकरण विसरणे प्रेक्षकांना शक्य नाही, हेच या प्रतिक्रियांवरून दिसतेय. त्यामुळे  ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय व कतरीना या गाण्याला कसा न्याय देतात, ते बघूच.  

Web Title: akshay kumar troll ignoring raveena in tip tip barsa paani song recreate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.