Akshay Kumar thinks that 'this' thing about women is sacred! | महिलांविषयी 'ही' गोष्ट अक्षय कुमारला वाटते पवित्र!

एकीकडे आपण देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहतो आहे आणि दुसरीकडे आजही सॅनिटरी नॅपकिन या विषयावर लोक साधी चर्चा ही करत नाहीत.21 व्या शतकातही मासिक पाळी आल्यावर मुलींना एक वेगळ्यात खोलीत ठेवले जाते.मासिक पाळी आल्यावर त्या मुलीला अमुक गोष्टीला हात लावू नकोस किंवा देवघरात जाण्याला बंदी असणे.अशाप्रकारे कोणत्या गोष्टीला हात लावण्याची परवानगी नसते.या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलला नाही.त्यामुळेच मासिक पाळीवेळी सॅनिटरी नॅपकीनचा योग्य वापर करणे या विषयावर आधारित एक पॅडपॅन रसिकांच्या भेटीला येत आहे.खिलाडी अक्षय कुमार सिनेमातून सॅनिटरी नॅपकिन,मासिक पाळी या विषयावर प्रकाशझोत टाकताना दिसणार आहे.एरव्ही महिलांविषयीच्या समस्या उघडपणे बोलले जात नव्हते.मासिक पाळी हा विषय तर सोडाच नेमकं या दरम्यान सॅनिटरी नॅपकीन वापरणे किती फायदेशीर ठरते या गोष्टी विषयी कधी बोलले गेले नाही.त्यामुळेच ‘लोकमत’सखी मंचच्या माध्यमातून खुद्द अक्षय कुमारने मासिक पाळीविषयी  हजार महिला आणि विद्यार्थ्यांशी पुण्यात संवाद साधला.मासिक पाळी येणे खुप पवित्र आहे कारण त्यामुळे आपण जन्माला येतो. 

मासिक पाळी बाबत ब-याच महिलांना अनेक गोष्टी माहित नाहीत.कारण त्याचं महत्त्व काय याबाबत तेवढी जागरुकता पसरवण्यात आलेली नाही.उलट याबाबत अनेक गैरसमज समाजात असून त्याबद्दल कुणालाही बोलायचं नाही.आजही 80 % महिलांपर्यंत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होत नाही. आणि हॉस्पिटल्सकडून त्याचा पुरवठा न होणे हेही त्यामागचं कारण असल्याचं मला समजलं.सॅनिटरी पॅड्स महाग असल्याने त्या खरेदी करण्यात त्यांना विशेष रस नसतो.त्यामुळेच मी माझ्या सिनेमाच्या माध्यमातून याबाबतचे गैरसमज दूर करुन जनजागृती करायचे ठरवलं असल्याचे अक्षयने सांगितले.

मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन या सगळ्यावर भाष्य करणारा पॅडमॅन हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात राधिका आपटे महत्त्वाची भूमिका साकारत आहे.पद्म पुरस्कार विजेते अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जीवनावर पॅडमॅन हा सिनेमा आधारित असून खिलाडी अक्षय कुमार यांत एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय अभिनेत्री सोनम कपूरचीही या सिनेमात लक्षवेधी भूमिका आहे. पॅडमॅन हा सिनेमा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केला असून येत्या 26 जानेवारीला हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  

Web Title: Akshay Kumar thinks that 'this' thing about women is sacred!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.